Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानमध्ये अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या सभेत ड्युटीसाठी जातांना अपघात

नागौर : राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यात रविवारी झालेल्या अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमींवर नागौर येथी

अपघातात दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू
दुचाकीस्वार गाडी घेऊन थेट खड्ड्यात.
तलवाडा ते गेवराई रोडवर समोरा समोर दूचाकी धडक

नागौर : राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यात रविवारी झालेल्या अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमींवर नागौर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काटा गावाजवळ हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व पोलिस कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत ड्युटीसाठी जात होते. मात्र, रस्त्यातच त्यांची कार ट्रकला धडकली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
चुरूच्या सुजानगढ सदर राणा भागात हा अपघात झाला. झुंझुनूमध्ये ड्युटीवर जाणार्‍या सात पोलिसांची कार महामार्गावर एका ट्रकला धडकली. या अपघातात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात नागौर जिल्ह्यातील खिनवसार पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रामचंद्र कुंभारम धनाराम, लक्ष्मण सिंग, सुरेश, पायल आणि कॉन्स्टेबल सुखराम यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींवर नागौर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डीजीपींनी आयजींना जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुःख व्यक्त केले. आज पहाटे चुरूच्या सुजानगढ सदर भागात एका वाहन अपघातात पोलिसांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी मिळाली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व पोलिसांच्या कुटुंबियांप्रती आमच्या संवेदना आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. डीजीपी उमेश मिश्रा यांनीही रस्ता अपघातात पोलिस कर्मचार्‍यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

COMMENTS