Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये वीज पडून मृत्यू 5 जणांचा मृत्यू

पाटणा ः अवकाळीचा कहर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर बिहार राज्यामध्ये देखील अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात वीज 5 जणांचा

जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती
केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 23 धावांनी विजय

पाटणा ः अवकाळीचा कहर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर बिहार राज्यामध्ये देखील अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात वीज 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहतास जिल्ह्यात जोरदार वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी वीज पडून पाचजण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये एका तरूणाचा देखील समावेश आहे. विविध राज्यांमध्ये अवकाळीचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांचा या पावसाने मृत्यू झाला आहे. पहिली घटना बिक्रमगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गोटपा गावात घडली. यावेळी पावसापासून वाचण्यासाठी झाडाच्या आडोशाला असलेल्या पाचपैकी दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज उपविभाग परिसरात इतर ठिकाणी वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण भाजले आहेत. यापैकी एकाला उपचारासाठी उच्च रूग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. दोन जणांवर बिक्रमगंज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

COMMENTS