Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोरगावकरांच्या ’नदीष्ट’ला 5 लाखांचा भाषा सन्मान

नांदेड प्रतिनिधी - बँक ऑफ बडोदाच्या पाच लाखांच्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराने गीतांजली श्री यांच्या हस्ते मनोज बोरगावकर यांचा गौरव करण्यात आला

मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा ः मंत्री दीपक केसरकर
अनिल गोटे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
मान्सूनवर ’अल निनो’चे सावट

नांदेड प्रतिनिधी – बँक ऑफ बडोदाच्या पाच लाखांच्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराने गीतांजली श्री यांच्या हस्ते मनोज बोरगावकर यांचा गौरव करण्यात आला. बँक ऑफ बडोदाच्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराने अल्लाह मियाँ का कारखाना या पुस्तकाचे लेखक मोहसिन खान आणि अनुवादक सईद अहमद यांचा गौरव करण्यात आला. रोख 36 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यात लेखकाला 21 लाख आणि अनुवादकाला 15 लाख रुपये देऊन सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या पाच लाखांच्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराने लेखक मनोज बोरगावकरांच्या नदीष्ट कादंबरीचा गौरव करण्यात आला. बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांच्या हस्ते लेखक मनोज बोरगावकर व नदीष्टचे हिंदी अनुवादक डॉ. गोरख थोरात यांचा सन्मान करण्यात आला. यात लेखकाला 3 लाख आणि अनुवादकाला 2 लाख रुपये देऊन गौरवण्यात आले. बँक ऑफ बडोदाच्या वतीने राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कारात एकूण 61 लाखांचे पुरस्कार देण्यात आले. त्यासाठी देशभरातील 70 अनुवादित साहित्यकृती स्पर्धेत होत्या. यातल्या 12 साहित्यकृतींना नामांकन मिळाले. त्यातल्या 6 साहित्यकृती सर्वोत्तम लेखनाच्या अंतिम फेरीत पोहचल्या होत्या. बुकर पारितोषिक विजेत्या सुप्रसिद्ध लेखिका गीतांजली श्री, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक अरुण कमल, पुष्पेश पंत, अनामिका आणि प्रभात रंजन हे साहित्यक परीक्षक म्हणून काम पहात आहेत. ’नदीष्ट’ ही प्रा. मनोज बोरगावकर यांची बहुचर्चित व वाचकप्रिय ठरलेली कादंबरी 2019 साली ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केली. नदीष्ट कादंबरी सुरुवातीपासूनच प्रचंड वाचकप्रिय ठरलीय. नदी , पर्यावरण व ’एलजीबीटी’ समूह ह्या आजच्या जागतिक स्तरावरील समस्यांवर ही कादंबरी आधारलेली आहे. निसर्ग , माणूस व त्यांचे अद्वैतभाव ती प्रकर्षाने दृग्गोचर करते. नदीष्टला आशय , विषय व रूपबंधाच्या आगळ्या-वेगळ्या मांडणीमुळे उदंड वाचक प्रेम तर लाभलेच पण राज्य शासनाचा हरी नारायण आपटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कन्नड , हिंदी भाषेत तीचे अनुवाद झाले अनेक भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे 

COMMENTS