कोपरगाव तालुका ः संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांना विनम्र अभिवादन करून संस्थेच्या 60 व्या वार्षीक
कोपरगाव तालुका ः संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांना विनम्र अभिवादन करून संस्थेच्या 60 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेची सुरूवात झाली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व संस्थेचे स्फुर्तीस्थान बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. सा. कारखानाचे चेअरमन विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या कोपरगांव तालुक्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. सा. कारखाना कामगार पतपेढीच्या 60 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत संस्थेला 46 लाखाचा नफा झाल्याची माहीती सभेचे अध्यक्ष साईनाथ पंढरीनाथ तिपायले यांनी दिली.
संस्थेने सभासदांच्या पाल्यांसाठी विद्यार्थी गुणवत्ता निधी स्थापन केला असून 10 वी व 12 वी मध्ये 70 टक्के व 75 टक्के पेक्षा जास्त गुणांनी पास झालेल्या 11 सभासदांच्या पाल्यांचा रोख स्वरूपात बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेने यावर्षी सभासद कल्याण निधीमधुन वैद्यकिय व मयत झालेल्या सभासदांच्या कुटूंबियासाठी रू. 19 हजाराचे आर्थिक सहाय्य दिले आहे. संस्थेचे भागभाडंवल 89 लाखाचे असुन संस्थेने गुंतवणुक केलेली रक्कम 7 कोटी इतकी आहे. संस्थेकडे मार्च अखेर 5 कोटीचे फंडस् जमा आहेत. संस्थेकडे ठेवी रक्कम 13 कोटीच्या असुन 12 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे अशी माहीती संस्थेचे मॅनेजर राजेंद्र दादा सोनवणे यांनी दिली. वार्षीक सर्वसाधारण सभेला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी सुतार , जनरल मॅनेजर (शुगर) एस. आर दिवटे , हेड ग्रुप एच आर मॅनेजर पी. जी. गुरव, युनियन सेक्रेटरी मनोहर शिंदे, चीफ अकौंटट एस. एन. पवार, डेप्यु चिफ अकौंटट पी. एन. टेमगर, लेबर ऑफिसर. एस. सी. चिने, ईटीपी इनचार्ज पी. एस. अरगडे, हेड टाईम किपर बी. एस. बेलोटे, गेस्टहाऊस इनचार्ज के. ए. वहाडणे, तसेच विद्यमान संचालक देवराम केदू देवकर,उत्तम भानुदास शेळके, सुभाष धर्माजी होन, सुरेश कोंडीराम मगर,आण्णासाहेब वसंत पगारे, सुदाम नामदेव उगलमुगले तसेच सभासद व संस्थेचा सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होता. वार्षीक सर्व साधारण सभेचे सुत्रसंचालन संस्थेचे संचालक विलास गोरखनाथ कहांडळ यांनी केले. शेवटी व्हा. चेअरमन केशव गोविंद बटवाल यांनी उपस्थितांचे आभार मानुन सभा संपल्याचे जाहीर केले
COMMENTS