कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतून व बिपीनदादा कोल

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील शिंगणापूर येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतून व बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला 46 लाख रूपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष देवराम केदु देवकर यांनी दिली.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवनी कार्यस्थळावर सोमवारी पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कामगार पतपेढीचे उपाध्यक्ष सुदामराव उगलमुगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मनेष गाडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सभासदांच्या 25 पाल्यांनी इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत 70 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवल्याबद्दल त्यांचे कौतुक करून उपस्थितांच्या हस्ते रोख स्वरूपात बक्षिसे देवुन सत्कार करण्यांत आला. संस्थेने हयावर्षी सभासद कल्याण निधीतुन वैद्यकिय व मयत सभासदांच्या वारसांना 82 हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात सर्वानुमते मंजुर करण्यांत आले. व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले सभासदांनी ते कायम केले. संस्थेचे भागभांडवल 90 लाख रूपये असुन गुंतवणुक 6 कोटी रूपये आहे. मार्च अखेर संस्थेकडे 5 कोटी रूपयांचे फंडस जमा आहेत. 13 कोटी रूपयांच्या ठेवी असून 12 कोटी रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. या वार्षीक सर्वसाधारण सभेस सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष मनेष गाडे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, मुख्य रसायनतज्ञ विवेककुमार शुक्ला, मानव संसाधन अधिकारी प्रदीप गुरव, कार्मिक अधिकारी व्ही. एस. भिसे, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, गेस्ट हाउस विभागाचे प्रमुख काशिनाथ वहाडणे, संस्थेचे संचालक सर्वश्री. साईनाथ तिपायले, उत्तमराव शेळके, सुभाष होन, सुरेश मगर, आण्णासाहेब पगारे, केशव बटवाल. कारखान्यांचे सर्व पदाधिकारी, खाते प्रमुख, उप खातेप्रमुख, सभासद, संस्था कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन संचालक गोरख कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष सुदामराव उगलमुगले यांनी आभार मानले
COMMENTS