Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मॉडेलिंग करणार्‍या तरुणीस 44 लाखांचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः मॉडेलिंग करणार्‍या तरुणीसह इतर तरुणींना कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने पाचजणांनी तब्बल 44 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघ

राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट
बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न पुरस्कार

पुणे/प्रतिनिधी ः मॉडेलिंग करणार्‍या तरुणीसह इतर तरुणींना कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने पाचजणांनी तब्बल 44 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींवर कोथरुड पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
श्रध्दा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा, जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे व अनिरुध्द बिपीन रासणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत पल्लवी प्रशांत सुबंध (वय-33, रा.हडपसर, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 9 मार्च ते 6 मे 2023 यादरम्यान घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, संबंधित आरोपींनी त्यांचे कोथरुड येथील क्लिक अँण्ड ब्रश कंपनीत काम देतो म्हणून इंस्टाग्राम व फेसबुकवर जाहिरात केली. त्याद्वारे दिवसाला पाच ते सात हजार रुपये पैसे देण्याचे अमिष आरोपींनी दाखवले. सर्व मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल, फॅशन डिझायनर यांचेकडून तीन महिने व दोन वर्षासाठी सबक्रिप्शनचे पैसे आरोपींनी घेतले. त्यानंतर गुंतवणुकदारांना तात्पुरते काही पैसे देवून त्यानंतर कंपनी अडचणीत असून काम बंद केल्याचे सांगण्यात आले. झालेल्या कामाचे व सबस्क्रिप्शनचे पैसे परत करण्याचे आश्‍वासन आरोपींनी देवून, गुंतवणुकदारांची तात्पुरती समजूत काढून पैसे न देता वेळोवेळी नवीन कारण सांगत दिशाभूल केली. संबंधित पैसे आरोपींनी संगनमताने, अप्रमाणिकपणे स्वत:चे व्यैक्तिक फायद्यासाठी वापरुन तक्रारदार व इतर साक्षीदारांची एकूण 44 लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास कोथरुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस चव्हाण करत आहे.

COMMENTS