नाशिक: उद्योग व व्यवसाय क्षेत्राला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन निपम चे
नाशिक: उद्योग व व्यवसाय क्षेत्राला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन निपम चे नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रकाश बारी यांनी केले ते संदीप फाऊंडेशन येथे निपम व संदीप युनिव्हर्सिटी व संदीप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एच आर कॉनक्लेव मध्ये बोलत होते.
यावेळी निपम चे सरचिटणीस हेमंत राख, निपम चे माजी अध्यक्ष डॉ उदय खरोटे ,खजिनदार विनायक पाटील, उपाध्यक्ष राजाराम कासार, , उपाध्यक्ष राहुल बोरसे, सहसचिव प्रकाश गुंजाळ, रमेश गवळी,राजेंद्र आचारी,तुषार मोहीम, सुस्मित्त दळवी,मनोज मुळे, ओझरकर, संदीप फाउंडेशन चे एचडी प्राध्यापक विवेक निकम, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पाटील, प्राचार्य डॉक्टर दीपक पाटील ,प्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत बोरसे ,प्राचार्य प्राध्यापक पंकज धर्माधिकारी, डायरेक्टर डॉक्टर अमोल पोटगंठवार ,अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश बुराडे ,डॉक्टर रूपाली खैरे, डॉक्टर विभा कपूर ,डॉक्टर भावना कडू, डॉक्टर निसार ऋषी आदी उपस्थित होते
निपम चे सरचिटणीस हेमंत राख यांनी निपम तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली, डॉ उदय खरोटे यांनी संदीप फाउंडेशन व संदीप युनिव्हर्सिटी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट च्या वतीने आयोजित एच आर कोन्क्लेव मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले व भविष्यात अशा प्रकारचे जास्तीत जास्त उपक्रम आयोजित करावे त्या योगे नानविन उपक्रमांना चालना देण्यात येईल असे त्यांनी सांगितले, संदीप विद्यापीठाचे व्यवस्थापन संचालक मंडल व सर्व एच आर मॅनेजर चे स्वागत हेमंत राख व डॉ रुपाली खैरे यांनी केले.
संदीप फाऊंडेशन व संदीप युनिव्हर्सिटी व निपम यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ जुलै रोजी संदीप फाउंडेशन मध्ये एच आर कोन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नामवंत कंपन्यांचे एच आर मॅनेजर्स सहभागी झाले होते संदीप फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टर दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व संदीप फाऊंडेशन मध्ये राबवल्या जात असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच संदीप फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना जगातील नामवंत युनिव्हर्सिटी मध्ये इंटर्नशिप व लाइव प्रोजेक्ट वर काम करण्याची कशी संधी मिळते याबद्दल विवेचन केले त्यांनी संदीप फाऊंडेशनचा गेल्या पंधरा वर्षाच्या प्रगतीचा आढावा व संदीप फाऊंडेशनच्या विशेष उपलब्धी सर्वांसमोर सादर केला यानंतर डॉक्टर रूपाली खैरे यांनी संदीप युनिव्हर्सिटी बद्दल उपस्थितांना अवगत केले ,आपल्या संबोधनात त्यांनी संदीप युनिव्हर्सिटीतील नवीन उपक्रमांची माहिती सर्वांना दिली त्यांनी संदीप युनिव्हर्सिटी मधील प्लेसमेंट चा आढावा उपस्थितांसमोर सादर केला यानंतर संस्थेचे ओएसडी प्राध्यापक विवेक निकम यांनी उपस्थिताना स्वागत करून सहकार्याचे आवाहन केले आपल्या भाषणात इन्स्टिट्यूट व इंडस्ट्री यांनी एकत्र यावे असे सांगितले आपल्या प्रतिपादनात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी दोघांनी हातात हात घालून पुढे जाण्याची गरज व्यक्त केली निपम तर्फे निपमचे चेअरमन श्री प्रकाश बारी यांनी संदीप फाऊंडेशन व संदीप युनिव्हर्सिटी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक केले नासिक मधील इंडस्ट्री नेहमी संदीप फाऊंडेशन व संदीप युनिव्हर्सिटी यांना सहकार्य करेल अशी त्यांनी अशा व्यक्त केली निपमचे सेक्रेटरी श्री हेमंत राख यांनी संदीप युनिव्हर्सिटी च्या व्याख्यात्यांनी इंडस्ट्रीमध्ये यावे व विद्यार्थ्यांसाठी संधी शोधाव्या अशी अपेक्षा प्रतिपादित केली इंडस्ट्री ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्ण उभी राहील अशी खात्री दिली
कार्यक्रमाचे पूर्वार्धात निपम ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेत निपमच्या वार्षिक कामकाजाचा आढावा सरचिटणीस हेमंत राख यांनी सादर केला निकम चे अध्यक्ष प्रकाश बारी यांनी निपमच्या सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्थक उत्तरे दिली व येत्या वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या संभाव्य कार्यक्रमांची माहिती दिली सर चिटणीस, हेमंत राख यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्र संचालन केले तसेच मागील वर्षीच्या सभेचे कार्यवृत्त वाचून दाखवले.. यावेळी निपम चे माजी अध्यक्ष डॉ उदय खरोटे, अडव्होकेट एस एस खैरनार,दिलीप महाले,पोपटराव सावंत, अशोक घुले,शरद बराटे, व्हीं बी डांगरे,सुधीर पाटील,रवींद्र चौबळ , डॉ अशोक सोनवणे आदींचा निपमच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ,पवन मगजी, सुधीर देशमुख, ऋषिकेश आहेर, विनय मोरे, नितीन मगर, संजय पाठक, राजू माने , गोविंद बोरसे,गिरीष मालपुरे, मकरंद. कुलकर्णी आदीसह १०० हून अधिक निपमाचे आजी माझी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित त्यांचे आभार प्रकाश गुंजाळ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तनुश्री दत्ता यांनी केले .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS