Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णसेवेची अविरत 40 वर्षे 

डॉ.बापये आय हॉस्‍पिटलच्‍या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑक्‍टोबरला व्‍याख्यान व अद्ययावत यंत्रांचे अनावरण

नाशिक –  डॉ सौ. मीना बापये यानी १९७५ साली नेत्र सेवेची मुहूर्तमेढ रोवून आजवर हजारो रुग्णांचे नेत्र विकार दूर करत त्याना दिलासा दिला आहे. त्यांत ड

दोन पोलिस एकमेकांना भिडले…सीसीटीव्हीत कैद झाले
फडणवीसांची ती ऑफर…रस्त्यातील नमस्कारासारखी…
ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये : ओबीसी काँग्रेसची मागणी

नाशिक –  डॉ सौ. मीना बापये यानी १९७५ साली नेत्र सेवेची मुहूर्तमेढ रोवून आजवर हजारो रुग्णांचे नेत्र विकार दूर करत त्याना दिलासा दिला आहे. त्यांत डॉ.बापये हॉस्‍पिटलने महत्त्वाचे योगदान दिले आहे. यशस्‍वी वाटचाल करत असलेल्‍या डॉ.बापये हॉस्‍पिटलच्‍या ४० व्‍या वर्धापन दिनानिमित्त व्‍याख्यानाचे आयोजन केले आहे. त्‍यासोबतच हॉस्‍पिटलमध्ये रुग्‍णसेवेसाठी उत्तर महाराष्ट्रात प्रथमच मोतीबिंदू उपचारासाठी प्रगत यंत्रसामग्रीचे अनावरण केले जाणार आहे.  

डॉ.बापये हॉस्‍पिटलच्‍या ४० व्‍या वर्धापन दिनानिमित्त येत्‍या १५ ऑक्‍टोबरला सायंकाळी ५ वाजता कॉलेज रोडवरील *गोखले एज्‍युकेशन सोसायटी संस्‍थेच्‍या गुरुदक्षिणा सभागृह* येथे व्‍याख्यानाचे आयोजन केले आहे. ज्‍येठ अभिनेते व नामांकित मानसोपचार तज्‍ज्ञ *पद्मश्री डॉ.मोहन आगाशे यांच्‍या उपस्‍थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रसिद्ध लेखक व तंत्रज्ञान क्षेत्राचे अभ्यासक *श्री अच्‍युत गोडबोले* यांचे ‘बदलते तंत्रज्ञान आणि आपले जीवन’ या विषयावर व्‍याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमास उपस्‍थित राहाण्याचे आवाहन डॉ. मनोहर बापये, डॉ.मीना बापये, डॉ.मनिष बापये, डॉ.चारुता बापये, यांनी केले आहे.

मोतीबिंदू शस्त्र क्रिये साठी आधुनिक यंत्रसामग्री होणार उपलब्‍ध- वर्धापन दिनानिमित्त हॉस्‍पिटलमध्ये आधुनिक यंत्र सामग्रीचे उद्‌घाटन ज्‍येष्ठ लेखक अच्‍युत गोडबोले यांच्‍या हस्‍ते होणार आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र स्‍तरावर पहिल्‍यांदाच अत्‍याधुनिक लेजर  तंत्रज्ञानाने युक्‍त अशा डोळ्यांच्‍या शस्‍त्रक्रियेसाठी (मोतीबिंदू सर्जरी) लागणारे ‘लेन्‍स-एक्‍स’ हे फेमटो सेकंड लेसर कॅटरॅक्ट सर्जरी या मशीनचे अनावरण केले जाईल. यासोबतच नेत्रविकाराच्‍या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘कॅलिस्‍टो आय’ या डिजीटल इमेज गाईडेड कॅटरॅक्ट सर्जरी प्‍लॅटफॉर्म, (झाईस) याचेही अनावरण केले जाणार आहे. यानंतर या आधुनिक सेवा रुग्‍णांसाठी खुल्‍या होतील, असेही डाॅ. बापये हॉस्‍पिटलतर्फे कळविण्यात आले आहे.

COMMENTS