Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवस्थान सुशोभीकरणास चार कोटीचा निधी मंजूर

अहमदनगर/प्रतिनिधी ः आगडगाव, केडगावसह नगर जिल्ह्यातील सहा देवस्थानांच्या विकासासाठी व सुशोभिकरणासाठी 4 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती खा. डॉ.

पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्‍वमेध कुणी रोखू शकणार नाही
पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण  करणार : डॉ. खा. सुजय विखे
अहमदनगर शहरात होणार आणखी तीन नवे उड्डाण पूल

अहमदनगर/प्रतिनिधी ः आगडगाव, केडगावसह नगर जिल्ह्यातील सहा देवस्थानांच्या विकासासाठी व सुशोभिकरणासाठी 4 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली.

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील सहा पर्यटन क्षेत्रास चार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान, केडगाव येथील रेणुकामाता देवस्थान मंदिर, जवळा येथील जवळेश्‍वर मंदिर, श्रीगोंदा येथील शेख मोहम्मद महाराज मंदिर, पाथर्डी येथील वृध्देश्‍वर देवस्थान आणि शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील निद्रिस्त गणपती मंदिर सुशोभीकरणासाठी एकूण चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या भागातील ग्रामस्थ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाची मागणी सातत्याने करीत होते. त्यामुळे यासाठी हा निधी विशेष प्रयत्न करून मंजूर केला असल्याचे खा. विखे यांनी सांगितले.

COMMENTS