श्रीरामपुरात गांजासह 4 जण अटक, 1 फरार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपुरात गांजासह 4 जण अटक, 1 फरार

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर हद्दीत गस्त घालत असताना शहरातील राजे छत्रपती संभाजी चौकात रात्री 2 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर

तरुणांनी संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ः निवृत्ती महाराज देशमुख
फोफसंडीत चिमुकल्या अपंग आदित्यचा संघर्ष सुरूच
पत्रकारांच्या हक्कासाठी संवाद यात्रेत सामील व्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर हद्दीत गस्त घालत असताना शहरातील राजे छत्रपती संभाजी चौकात रात्री 2 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांनी ओमोनी कार (क्रमांक एमएच 14 सीके 9288) संशय आल्याने तिचा पाठलाग पकडली व पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता या गाडीत पिशवीभर गांजा नावाच्या अमली पदार्थाच्या पुड्या सापडल्या. पोलिसांनी या प्रकरणी गाडीतील तुषार शेकडे (वय 24), अरफन शेख (वय 21), तोफिक इनामदार (वय 34) व मोबिन अत्तार (वय 20, सर्व राहणार जुन्नर, जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेतले. यावेळी समीर शिंदे हा युवक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, सर्व जण जुन्नर येथून श्रीरामपूरला आल्याची माहिती त्यांनी दिली. पसार झालेल्या शिंदेबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने हे सर्व जण दरोड्याच्या उद्देशाने आले असल्याचा संशय आल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

COMMENTS