अमृतसर : पंजाबच्या अमृतसरमध्ये सोमवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी होती. अमृतसरसह पंजाबच्या काही भागांत
अमृतसर : पंजाबच्या अमृतसरमध्ये सोमवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी होती. अमृतसरसह पंजाबच्या काही भागांत सोमवारी पहाटे 3 वाजून 42 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) अनुसार, भूकंपाचं केंद्र पंजाब, पाकिस्तानमध्ये होतं. भूकंपाची खोली 120 किमी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यापूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या आठवड्यात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या एका आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये दोनदा भूकंपांचे धक्के जाणवले होते. रोजी दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये शनिवारी 12 तारखेला भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले होते. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, बिजनौरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. यापूर्वी 9 नोव्हेंबरला भूकंप झाला होता. त्यानंतर भारत, चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यांची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह 7 राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचवेळी नेपाळमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक विध्वंस झाल्याची बातमी समोर आली होती. भूकंपामुळे केवळ अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती, तर 6 जणांचा मृत्यू झाला होता.
COMMENTS