मुंबई : राज्यात शनिवारपासून सर्वदूर पाऊस होतांना दिसून येत आहे. मुंबई, पुणे, विदर्भ, आणि कोकणात मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीपातळी चांगलीच वाढल
मुंबई : राज्यात शनिवारपासून सर्वदूर पाऊस होतांना दिसून येत आहे. मुंबई, पुणे, विदर्भ, आणि कोकणात मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीपातळी चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही धरणांमधून विसर्ग करण्यात येत असून अनेक धरणांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, राज्यातील एकूण धरणांमध्ये आता 36.07 टक्के उपयुक्त धरणसाठा आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 15.26 टक्के पाणीसाठा शिल्लक असून राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा सर्वात कमी धरणसाठा आहे. कोकणात सुरु असलेले मुसळधार पावसाने भातसा धरणासह सुर्या धामणी व अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून कोकणातील धरणे आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होत असल्याने धरणांमध्ये हळुहळु पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जायकवाडीचा पाणीसाठा अजूनही 5 टक्क्यांच्या वर न गेल्याने मराठवाड्यातील हजारो गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे.
COMMENTS