Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून 34 कैद्यांची सुटका 

  नागपूर प्रतिनिधी - २६ जानेवारी आणि भारतात सुरू असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतात कैद्यांची सुटका होत आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह

शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई
श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन

  नागपूर प्रतिनिधी – २६ जानेवारी आणि भारतात सुरू असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतात कैद्यांची सुटका होत आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आज ३४ कैद्यांची सुटका करण्यात आली. या 34 कैद्यांपैकी 33 हे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील असून एक कैदी मुंबई मध्यवर्ती कारागृहातील असून त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. कैद्यांच्या नातेवाइकांना कारागृह प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली.त्यामुळे कैद्यांचे नातेवाईकही सकाळ पासूनच कारागृह परिसरात पोहोचले.नागपूर मध्यवर्ती कारागृहात सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर या कैद्यांची सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येताच काही कैद्यांचे डोळे नातेवाईकांना भेटताच भावूक झाले. सरकारने हा उपक्रम सुरू ठेवावा, असे याच कैद्यांनी सांगितले.

COMMENTS