Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूत विषारी दारूमुळे 34 जणांचा मृत्यू

चेन्नई ः तामिळनाडू राज्यातील कल्लाकुरिचीत विषारी दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 34 वर पोहोचली आहे, तर 60 हून अधिक जणांवर वेगवेगळ्या रुग्

आमदार जगतापांचा कोटयवधीचा भ्रष्टाचार ; मुख्यमंत्र्यांकडं तक्रार |
शेतकर्‍यांच्या वीज बिलाच्या रकमेची ऊस बिलातून वसुली
आरोपीवर कोठडीत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरण | LokNews24

चेन्नई ः तामिळनाडू राज्यातील कल्लाकुरिचीत विषारी दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 34 वर पोहोचली आहे, तर 60 हून अधिक जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी पाकिटांमध्ये उपलब्ध दारूचे सेवन केले होते. कल्लाकुरिची जिल्ह्यातील करुणापुरम येथे घडलेल्या घटनेतील बहुतेक बळी रोजंदारी मजूर होते. दारू प्यायल्यानंतर रात्रीच्या वेळी या लोकांना जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि डोळ्यात जळजळ होण्याचा त्रास होऊ लागला. या प्रकरणी पोलिसांनी के कन्नुकुट्टी (49) याच्यासह 4 जणांना अटक केली आहे.

COMMENTS