Homeताज्या बातम्यादेश

एकाच कुटुंबातील 3 मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू

रायपूर: एकाच कुटुंबातील तीन मुलांची विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे प्रकरण छत्तीसगडच्या रायपूरमधील आहे. जिल्ह्यातील आरंग

राजस्थानमध्ये भाजपची 14 जागांवर आघाडी
महाराजस्व अभियानात लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश
हरियाणात भाजप सरकार कोसळणार ?

रायपूर: एकाच कुटुंबातील तीन मुलांची विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे प्रकरण छत्तीसगडच्या रायपूरमधील आहे. जिल्ह्यातील आरंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारोडा गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. येथे आठ वर्षांची केसर साहू, केसरचा लहान भाऊ उल्लास साहू आणि चुलत भाऊ पायस साहू अशी तीन मुले विहिरीत पडली. या घटनेत तिन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही तीन मुलं घराजवळील झाडावरून पेरू तोडत होती. झाडाजवळ मोठी विहीर आहे. पेरू तोडताना त्यांचा तोल जाऊन ही मुलं विहिरीत पडली. उशिरापर्यंत मुलं घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. विहिरीची जाळी आणि झाडाच्या फांद्या तुटल्याचं मुलांच्या आजीने पाहिलं. तिने विहिरीत डोकावून पाहिलं तर मुलं पडलेली दिसली. त्यांनी आरडाओरड करत कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती दिली. आजीची हाक ऐकून कुटुंबीय धावत त्या दिशेने गेले, त्यांनी तात्काळ मुलांना विहिरीतून बाहेर काढलं. पण, तोपर्यंत या तिघांचाही मृत्यू झालेला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

COMMENTS