Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड मध्ये भरले दुसरे मराठी साहित्य संमेलन

बीड प्रतिनिधी - महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी साहित्य वार्ता औरंगाबाद आणि महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्स

फडणवीस यांना हप्तेखोरीचा मोठा अनुभव : पटोले
आण्णा हजारे जागे झाले !
महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट

बीड प्रतिनिधी – महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी साहित्य वार्ता औरंगाबाद आणि महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती बीड च्या संयुक्त विद्यमाने  14 मे रोजी सकाळी 08.00 वा संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून माळीवेस चौक सुभाष रोड-अण्णाभाऊ साठे चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- नगर रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सकाळी 10.00 वा दुसरे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन समारंभ संमेलनाध्यक्ष तथा चिंतनशील लेखक, औरंगाबाद प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, उद्घाटक जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, मुंबई मा. ज. वि. पवार, यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, अण्णा भाऊ साठे शि.प्र.मं. सचिव बीड मा उत्तम पवार, प्रमुख पाहुणे नालंदा फाऊंडेशन बीडचे अध्यक्ष  प्रा.प्रदिप रोडे,प्रा.भारत सिरसाट,प्रा. अरविंद खांडके, सोनवणे साहेब, मराठी साहित्य वार्ता चे मुख्य संपादक अमरदीप वानखेडे, डॉ. प्रकाश इंगळे ,प्रा.डॉ.रवि सुरवसे यांची उपस्थिती होती.  याप्रसंगी अध्यक्षीय भाषण व मराठी साहित्य वार्ता स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दुपारी 12.00 वा.परिसंवाद विषय: लोकशाहीसमोरील आव्हाने; साहित्यिक/कलावंतांची भूमिका अध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश बनसोड (मुंबई विद्यापीठ) प्रमुख व्याख्याते डॉ. रेखा मेशाम (संपादक, रमाई मासिक औरंगाबाद), प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे (बीड), प्रमुख पाहुणे- डॉ. दैवत सावंत (औरंगाबाद),  मा. संदिप उपरे (प्रसिध्द उद्योजक, बीड), डॉ. शेखर मगर (औरंगाबाद), मा.अशोक मसलेकर (बीड),  प्रा. विष्णु जाधव (बीड) यांच्या उपस्थितीत सदरील कार्यक्रम पार पडला. दुपारी 2 वा भोजन आवकाश आणि दुपारी 03.00 वा मा.ज.वि.पवार यांची प्रो.डॉ. मनोहर सिरसाट यांनी प्रकट मुलाखत घेतली. सायं. 04.00 वा. द्विभाषिक कवीसंमेलन भरले होते.या संमेलनाचे अध्यक्ष- प्रा.डॉ. संजय कांबळे (बीड),सहभाग मा.हृदयमानव अशोक (पुणे), मा. रंजना कराडे (अमरावती), आयु. सुदाम मगर (औरंगाबाद),मा. प्रविण बोपुलकर (मुंबई), मा. नरेंद्र लोणकर,(अमरावती), मा. अमोल चरडे (पुणे),  आयु. मिलिंद इंगळे (अकोला), आयु. प्रविण सोनोने (यवतमाळ), मा. प्रतिभा मंडले (पनवेल), मा. देवेंद्र इंगळकर (विलेपार्ले), आयु. रामचंद्र रोडे (बीड), आयु. अमोल घटविसावे (अ.नगर), मा. अश्विनी      अतकारे (मुंबई), मा.नलिनी पवार (पुणे), मा. मनिषा शिरटावले (सातारा) ,मा. डॉ. मनोहर घुगे (अकोला) यांची उपस्थिती होती. सायंकाळी 06.00 वा. समारोप  सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी संयोजन समिती सदस्य प्रा.शरद वंजारे, सागर धोडपकर, नितीन फंदे, संतोष अंभोरे, अमोल किरवले, नितीन हजारे, रविंद्र गवई, नालंदा वाकोडे, प्रविण हिवराळे, अजित शिंदे, अनिल दिपके, संदिप फंदे,डॉ.अण्णासाहेब सोनवणे, प्रा. राम गायकवाड,प्रा. दिपक जमदाडे, सिद्धार्थ वाघमारे, अँड. नागसेन वानखडे,प्रा. डॉ. भास्कर अहिरे, प्रा. विनोद किर्दक, प्रा.डॉ. प्रेमचंद सिरसाट,डॉ. उत्तम साळवे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS