Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी आयोजन

सभासदांनी सभेस उपस्थित रहावे - अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांचे आवाहन

अंबाजोगाई प्रतिनिधी - विश्वास, विकास आणि विन्रमता हा महामंत्र घेवून आर्थिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणार्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची 27

मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात
जामखेडमध्ये चोरट्यांनी डोके काढले वर
विधानसभेपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकावे

अंबाजोगाई प्रतिनिधी – विश्वास, विकास आणि विन्रमता हा महामंत्र घेवून आर्थिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणार्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कै.गोपिनाथराव मुंडे सभागृह, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आली आहे. या सर्वसाधारण सभेस बँकेच्या सभासदांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन व विनंती बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, ऍड.उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी केली आहे.
दीनदयाळ नागरी सहकारी बँक ही सर्वसामान्य माणसाला आपली बँक वाटते त्याचे कारण या बँकेने ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतक यांचा विश्वास संपादन केल आहे. मागील 27 वर्षांपासुन सहकार क्षेत्रात काम करताना बँकेने माणसे जोडण्याचे काम केले आहे. प्रती वर्षाप्रमाणे विवेकानंद व्याख्यानमाला बँक परंपरेप्रमाणे पुढे नेत आहे. सामाजिक भान कायमस्वरूपी कामाचा भाग करून बँक बँकींग क्षेत्रातील नवे बदल स्विकारत, आव्हाने पेलत दीनदयाळ बँक वेगाने प्रगतीकडे झेपावत आहे. डिजीटल बँकींग प्रणालीचा स्विकार करीत ग्राहकांना सर्वोत्तम बँकींग सेवा देण्याचे काम बँक करीत आहे. मागील 27 वर्षांपासुन मुख्यालयांसह बँकेच्या एकुण 17 शाखा कार्यरत आहेत. दि. 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षा अखेर बँकेची एकुण सभासद संख्या – 13227 इतकी आहे. तर बँकेकडे (1469.66) इतके भागभांडवल असून एकुण ठेवी (46844.63) एवढ्या आहेत. बँकेने (28884.99) इतके कर्जवाटप केले आहे. बँकेस (386.52) एवढा करपुर्व नफा झाला आहे. तर बँकेकडे (53186.84) एवढे खेळते भांडवल आहे., बँकेकडे तज्ज्ञ प्रशिक्षित 160 एवढा कर्मचारी व अधिकारी वर्ग असून सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात बँकेने ऑडीट ’अ’ वर्ग प्राप्त केला आहे (कंसातील सर्व आकडे हे लाखात आहेत). बँकेच्या यशात व सर्वांगिण प्रगतीत बँकेच्या मार्गदर्शिका व संचालिका पंकजाताई गोपिनाथराव मुंडे – पालवे यांचे सातत्यपुर्ण मार्गदर्शन तसेच बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, संचालक रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, राजाभाऊ दहिवाळ, इंजि.बिपीन क्षीरसागर, प्राचार्य किशन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक भिमा ताम्हाणे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर तसेच बँकेचे सर्व अधिकारी, शाखा अधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट यांचे आणि बँकेचे ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक यांचेही महत्वपुर्ण योगदान आहे. अशी माहिती देवून अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, ऍड.उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी सभासदांच्या अपेक्षा, बँकींग सेवा योग्य व पारदर्शक रहाव्यात यासाठी बँक प्रयत्न करीत आहेच आपल्या सुचनांमुळे अधिक गुणवत्तेत आणखीन भर पडेल असा विश्वास व्यक्त करून दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

COMMENTS