मुंबई : गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असून राज्यभरातील गणेशभक्तांची व सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. मुंबईतील सार

मुंबई : गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असून राज्यभरातील गणेशभक्तांची व सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारीही आता अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील सर्वांचा लाडका आणि मोठा असलेला लालबागच्या गणरायाचा यंदाच्या वर्षी तब्बल 26.5 लाखांचा विमा काढण्यात आला आहे.
मंडळात दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी आणि मूर्तीच्या अंगावरील मौल्यवान दागिन्यांचा विचार करून सुरक्षेच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणारा हा गणेशोत्सव तब्बल 10 दिवस चालणार आहे. शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात मोठ्या गणेश मूर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडपात स्थापनेसाठी आणल्या आहेत. लालबागचा गणपती हा राज्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.या वर्षी या मूर्तीची जागेवरच तयार करण्यात आली आहे. यामुळे या वर्षी मिरवणूक न काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरम्यान, या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने न्यू इंडिया अॅश्युरन्सकडून 26.54 कोटी रुपयांचा विमा काढला आहे. यात आग, चोरी, अपघात यांच्या जोखमी बरोबर चेंगराचेंगरी, दहशतवाद आणि प्रसादाद्वारे विषप्रयोग आदी बाबी या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 24 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर हा पॉलिसीचा काळ आहे.
COMMENTS