Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहत्यात एका सरपंचासह 25 सदस्य बिनविरोध

166 उमेदवारांनी घेतली माघार ; 288 उमेदवार रिंगणात

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीचे निवडणुकीसाठी दाखल एकूण 496 अर्जांपैकी 166 उमेदवारांनी आपले अर्ज  माघारी घेतल्याने निवडण

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
जामनेर तालुक्यातील १२ पैकी ९ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात
ग्रामपंचायत निवडणूक तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात 

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीचे निवडणुकीसाठी दाखल एकूण 496 अर्जांपैकी 166 उमेदवारांनी आपले अर्ज  माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात 288 उमेदवार राहिले आहेत त्यामध्ये सरपंच पदासाठी 32 उमेदवार तर सदस्यासाठी 256 उमेदवार आपले राजकीय भवितव्य निवडणुकीत आजमविणार आहेत बहुतांशी ग्रामपंचायतच्या लढती या दुरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे  होण्याचे अर्ज माघारी नंतर 24 ग्रामपंचायत सदस्यांसह लोहगाव ग्रामपंचायत  निवडणूक बिनविरोध झाली आहे त्यामुळे आता तालुक्यात अकराच ग्रामपंचायतची निवडणूक होईल.


उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायत निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नांदुर्खी बुद्रुक सरपंच पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 32 असे एकूण 36 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदुर्खी खुर्द सरपंच पदासाठी 2 तर सदस्यासाठी 14 असे मिळून एकूण 16 उमेदवार, राजुरी सरपंच पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 33 एकूण 40 डोराळे सरपंच पदासाठी 2 तर सदस्यासाठी 18 साकुरी सरपंच पदासाठी 2 तर सदस्यासाठी 38 खडकेवाके सरपंच पदासाठी 2 तर सदस्यासाठी 18 रांजणखोल सरपंच पदासाठी 4 तर सदस्यासाठी 24 आडगाव खुर्द सरपंच पदासाठी 3 तर सदस्यासाठी 13 सावळीविहीर बुद्रुक सरपंचासाठी 2 सदस्यासाठी 19 नपावाडी सरपंच साठी 2 तर सदस्य साठी 18 निघोज सरपंचासाठी 2 तर सदस्यासाठी 29 याप्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. सावळीवीहीर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याकरिता स्थानिक पुढार्‍यांनी व नेत्यांनी शेवटपर्यंत शर्तीचे प्रयत्न केले परंतु ही निवडणूक बिनविरोध करण्यास स्थानिकांना अपयश आले आहे तर तालुक्यात लोहगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून या गावाने नवा आदर्श दिला आहे. त्याचप्रमाणे साकुरी ग्रामपंचायत निवडणुकीत 1 रांजणखोल ग्रामपंचायत मध्ये 3 लोहगाव ग्रामपंचायत मधील 13 आडगाव खुर्द ग्रामपंचायत 1 सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत 6 अशा मिळून एकूण 24 सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत, तर लोहगावचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत, तर नांदुरखी खुर्द डोर्‍हाळे साकुरी खडकेवाके सावळीविहीर नपावाडी निघोज या सात ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी एकास एक अर्थात दुरंगी लढत होणार आहे. राजुरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी सप्तरंगी तर नांदुरखी बुद्रुक व रांजणखोल मध्ये सरपंच पदाची निवडणूक चौरंगी होणार आहे आडगाव खुर्द मध्ये सरपंच पदाची निवडणूक तिरंगी होईल असे चित्र स्पष्ट झाले आहे.

COMMENTS