पारनेर : राज्य शासनाच्या नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागामार्फत राबविण्यात येणार्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत

पारनेर : राज्य शासनाच्या नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागामार्फत राबविण्यात येणार्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील 36 गावांमधील 105 किलोमिटर अंतराच्या रस्त्यांसाठी 25 कोटी 20 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली.
विविध गावांमधील शेतकरी वर्गाकडून शिव पाणंद रस्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद योजनेअंतर्गत विविध गावांतील रस्त्यांसाठी नियोजन विभागाच्या रोजगार हमी योजना प्रभागाकडे पाठपुरावा करून जिल्हयात सर्वाधिक निधी मंजुर करण्यात यश आल्याचे आ. लंके यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघात रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली. यामध्ये मुंगशी 4, निघोज 2, पळशी 3, भाळवणी 1, लोणीमावळा 2, भोयरे गांगर्डा 2, वडगांव सावताळ/ गाजदीपूर 10, म्हसोबा झाप 7, सावरगांव काळेवाडी 7, ढोकी 2, तिखोल 1, ढवळपुरी 7, सांगवी सुर्या 1, कळस 5, टाकळीढोकेश्वर 3, रांधे 1, वाडेगव्हाण 4, करंदी 2, हत्तलखिंडी 2 बाबुर्डी 6, काताळवेढे 2, कान्हूरपठार 3, वाळवणे 2, हंगा 3, हिवरे झरे 2, वाकोडी 3, खडकी 1, पिंपळगांव कौडा 1, भोयरे पठार 1, निमगांव वाघा 2, चास भोरवाडी 1, भोरवाडी 1, शिंगवे नाईक 14 चा समावेश आहे.
चौकट
जिल्हयात सर्वाधिक निधी
नगर जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी एकूण 316 किलोमिटर रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजुर झाला असून त्यापैकी सर्वाधिक 105 किलोमिटरसाठी निधी पारनेर-नगर मतदारसंघासाठी खेचून आणण्यात आ. नीलेश लंके यांना यश आले आहे.
COMMENTS