Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परदेशी ब्रँडच्या 24 कोटींच्या सिगारेट जप्त

मुंबई : दोन दिवसांपूर्वी 12 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर सोमवारी गुप्तचर विभागाच्या विशिष्ट माहितीच्या आधारे मुंबईच्या महसूल गुप्तचर विभाग

बॅगमध्ये आढळला 2 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह
व्यापार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध
एसटीला सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा – अजित पवार

मुंबई : दोन दिवसांपूर्वी 12 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर सोमवारी गुप्तचर विभागाच्या विशिष्ट माहितीच्या आधारे मुंबईच्या महसूल गुप्तचर विभागाने न्हावा शेवा बंदरात अवैध पदार्थांची वाहतूक करणारा एक कंटेनर पकडला. हा कंटेनर पुढील मंजुरीसाठी अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवला जाणार होता. यातून परदेशी ब्रँडच्या 24 कोटींच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.
या कंटेनरच्या हालचालींवर डीआरआयच्या अधिकार्‍यांनी बारीक लक्ष ठेवून होते. कंटेनरने बंदर सोडल्यानंतर,  गंतव्यस्थानी पोहोचण्याऐवजी तो अर्शिया एफटीडब्ल्यूझेडकडे जात असताना एका खाजगी गोदामाकडे वळवण्यात आला होता. आयात करण्यात आलेल्या कंटेनरमधून विविध परदेशी ब्रँडच्या 1.07 कोटी सिगारेटी जप्त करण्यात आल्या. त्याचा  पाठपुरावा करताना त्याच टोळीकडून  यापूर्वी तस्करी करण्यात आलेल्या विविध परदेशी ब्रँडच्या 13 लाख सिगारेटी दुसर्‍या एका गोदामातून जप्त करण्यात आल्या. महसूल गुप्तचर विभागाने जप्त केलेल्या या परदेशी 1.2 कोटी सिगारेटचे एकूण  बाजार मूल्य सुमारे 24 कोटी रुपये आहे. या कारवाईत आयातदारासह पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणार्‍या अधिकार्‍यांना लगेच संशयास्पद हालचाली  जाणवल्या आणि त्यांनी गोदामात कंटेनर अडवला. या  40 फूट लांब कंटेनरमध्ये परदेशी कंपनीच्या  सिगारेट्स भरलेल्या होत्या आणि  भारतीय मानकांचे पालन न केल्यामुळे भारतात त्यांची आयात करण्यास बंदी आहे. सीमाशुल्क अधिकार्‍यांना फसवण्यासाठी त्या सिगारेट्स कंटेनरमधून काढून आयात दस्तावेजांमध्ये  घोषित केलेल्या वस्तूंजागी ठेवून त्यांची तस्करी करण्याची योजना आखण्यात आली  होती.  हा कंटेनर अर्शिया एफटीझेडमध्ये नेण्यापूर्वी, सिगारेट्स  काढून टाकल्यानंतर कंटेनरमध्ये भरावयाच्या आयात मालाचा गोदामात आधीच साठा केलेला होता.

COMMENTS