23 वर्षांच्या तरुणाचा किक बॉक्सिंग सामन्यादरम्यान मृत्यू !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

23 वर्षांच्या तरुणाचा किक बॉक्सिंग सामन्यादरम्यान मृत्यू !

आयोजकांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप.

किक बॉक्सिंग चॅम्पिअनशिप(Kick Boxing Championship) दरम्यान 23 वर्षांच्या एका तरुणाचा जीव गेला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. निखिल सुरेश(Nikh

शिंदे -सेना संघर्ष घटनापीठाकडे !
पुण्यात पार्किंगमधील दुचाकी जाळल्या
देवगांव येथे नवरात्र महोत्सवा निमीत्त रेणुकामाता मंदिर परिसरात रविवार पासुन आराधी गितांचा भव्य कार्यक्रम

किक बॉक्सिंग चॅम्पिअनशिप(Kick Boxing Championship) दरम्यान 23 वर्षांच्या एका तरुणाचा जीव गेला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. निखिल सुरेश(Nikhil Suresh) या मृत किक बॉक्सरचं नाव आहे. लाईव्ह सामन्यात एका पंचने निखिल जागच्या जागी कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. तिथे निखिलची नाजूक प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर(On the ventilator) ठेवले. पण कोणत्याच उपचाराना निखिल प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. निखिलच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी किक बॉक्सिंग चॅम्पिअनशिपचं आयोजन करणाऱ्या आयोजकांवर आरोप केले आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे निखिलचा जीव गेला, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत आता पुढील तपास सुरु केलाय.

COMMENTS