Homeताज्या बातम्यादेश

इस्रायलमधून 212 भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली ः गाझा पट्टीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये धुमश्‍चक्री सुरू आहे. पॅलेस्टाईन या देशातील हमास या दहशतवादी संघटनेने या युद

यंदा मान्सून 7 जूनला येणार
२२ लाख २३ हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी
रात्रीच नंबर लावायला निघाले, काळाने डाव साधला, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

नवी दिल्ली ः गाझा पट्टीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये धुमश्‍चक्री सुरू आहे. पॅलेस्टाईन या देशातील हमास या दहशतवादी संघटनेने या युद्धाला तोंड फोडले असून, यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात परकीय देशातील लाखो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या देशात नेण्यासाठी मोहीमा आखण्यात येत असून, भारताने देखील आपल्या नागरिकांना आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून 212 भारतीयांना घेऊन पहिल्या विमानाने गुरुवारी रात्री भारताच्या दिशेने उड्डाण भरले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हे विमान दिल्लीत दाखल झाले आहेत.
यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण 212 भारतीयांचा समावेश आहे. मायदेशात परताच या भारतीयांनी सुटकेचा श्‍वास सोडला असून मोदी सरकारचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर या नागरिकांचे स्वागत केले आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, एअर इंडियाने इस्रायलमधून आपली सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली होती. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. त्यासाठी गुरुवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, इस्रायलमध्ये सुमारे 18 हजार भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांना परत आणले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार इस्रायलमधून ज्या लोकांना आणत आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही. दरम्यान, भारतात येणार्या विमानांमध्ये चढण्यासाठी इस्रायलमधील तेल अवीव विमानतळावर भारतीयांनी गर्दी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. इस्रायलमध्ये शिकणार्‍या शुभम कुमार या विद्यार्थ्याने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून बहुतांश भारतीय विद्यार्थी घाबरले होते. पण भारतीय दूतावासाने काही सूचना जारी केल्या. यामुळे आमचे मनोबल वाढले आणि आम्हाला परत येण्याची परवानगी मिळाली.

गुप्तचर यंत्रणांच्या इशार्‍यानंतर राजधानीत हाय अलर्ट – इस्रायल आणि हमासमध्ये मागील 7 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संपूर्ण जगावर काही प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. इस्राइल-हमास यांच्यातील युद्धामुळे नवी दिल्लीतही तणाव वाढला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीसह अनेक शहरांसाठी अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे की, शुक्रवारी देशाच्या राजधानीसह अनेक शहरांमध्ये निदर्शनांच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या माहितीनंतर दिल्ली पोलीस आता सतर्क झाले आहेत.

COMMENTS