अहमदनगर प्रतिनिधी - जाहिरात बाजीवर कुणीही गतिमान होत नसतं. 2024 ला राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झालेले दिसतील, असा सूचक
अहमदनगर प्रतिनिधी – जाहिरात बाजीवर कुणीही गतिमान होत नसतं. 2024 ला राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झालेले दिसतील, असा सूचक इशारा कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर या ठिकाणी दिलेला आहे. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. भाषणं मात्र मोठ-मोठी करतात व सुंदर करतात असे देखील थोरात यांनी सांगितले. पुण्याच्या पोटनिवडणुकीतून जनमत हे भाजप व शिंदे सरकारच्या विरोधात गेले असल्याचे देखील बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
संगमनेरमध्ये कॉंग्रेसचे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन व रास्ता रोकोत थोरात सहभागी झाले होते. यावेळी सरकारवर सडकून टीका थोरातांनी केली आहे. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, तसेच शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा, कांद्याना हमीभाव मिळावा व शासनाने तो खरेदी करावा, अशा विविध प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्लात म्हणजेच संगमनेरमध्ये हे आंदोलन सुरू होते.
COMMENTS