Homeताज्या बातम्यादेश

2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद होणार !

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इ

डीजेप्रकरणी 14 मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे
माळशिरस रस्त्यावर मोटारसायकलच्या धडकेत दोन तरूणांचा जागीच मृत्यू
प्रा. डॉ. विजय देशमुख यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक  पुरस्कार

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील. ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये. मात्र, असे असले तरी २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना करण्यात आलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.

COMMENTS