Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागृती शुगर कडून 200 रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा

लातूर प्रतिनिधी- जागृती शेतक-यांची प्रगती या ब्रीदवाक्या प्रमाणे मराठवाडा व विदर्भ राज्यात खाजगी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असलेल्या उस उत

वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चॅनल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात महिलेचा गेला तोल 
पंढरपूर येथिल मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या  निवडणूक प्रक्रियेस सुरवात 

लातूर प्रतिनिधी- जागृती शेतक-यांची प्रगती या ब्रीदवाक्या प्रमाणे मराठवाडा व विदर्भ राज्यात खाजगी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असलेल्या उस उत्पादक शेतक-यांना एफआरपी पेक्षा अधिक भाव देणा-या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याने चालु गाळप हंगामात 6 लाख 32 हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून आजतागायत चालु हंगामात 151 कोटी 68 लाख 240 रुपये शेतक-यांना अदा केली आहेत. मांजरा साखर परिवाराच्या धोरणानुसार चालु हंगामात 2 हजार 200 रूपये मेट्रिक टन प्रमाणे पहिल्या हप्तापोटी 139 कोटी 4 लाख 220 रूपये तर दुसरा हप्ता 200 रुपये प्रमाणे 12 कोटी 64 लाख असे एकूण 151 कोटी 68 लाख 240 रुपये शेतक-यांना अदा केले आहेत. यामुळे देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, चाकुर, उदगीर, लातूर, औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एकेकाळी उजाड माळरान असलेल्या व गेल्या दहा वर्षांपासून शेतक-यांच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या तळेगाव येथील जागृती शुगरने पहिल्या गळीत हंगामापासून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अधिक भाव देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे या भागातील शेतक-यांचा आर्थिक विकास बघायला मिळत आहे. शेती सुधारली उसाचे क्षेत्र वाढले माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 11 वर्षात कारखान्याने अतिशय काटेकोर पणे नियोजन करून उस उत्पादक शेतक-यांना झुकते माप देण्याचे काम जागृती शुगरच्या संचालक मंडळाने केले असून यापुढेही करण्याचा निश्चितच प्रयत्न करू अशी माहिती जागृती शुगरच्या अध्यक्षा सौ गौरवी भोसले देशमुख यावेळी बोलताना सांगितले.जागृती शुगर कारखान्याकडून चालु गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतक-यांना दुस-या हप्त्याची रक्कम 200 रूपये उसाच्या प्रति मेट्रिक टन पोटी 12 कोटी 64 लाख रुपये खात्यावर वर्ग केले आहेत. चालु गळीत हंगामात उस देणा-या सभासदांनी खात्यावरील रक्कम घ्यावी, असे आवाहन जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, सरव्यवस्थापक गणेश येवले, संचालक मंडळ यांनी केले आहे.

COMMENTS