संगमनेर ः रस्त्याने जाणार्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस शाळेत सोडतो असे सांगून तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणार्या संगमनेर तालुक्यातील न
संगमनेर ः रस्त्याने जाणार्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस शाळेत सोडतो असे सांगून तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणार्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय 27 वर्ष) याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी 20 वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
घारगाव परिसरातील या खटल्याकडे पठार भागातील संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. 12 डिसेंबर 2018 रोजी पीडित मुलगी कच्चा रस्त्याने शाळेत जात असताना तेथे मोटरसायकलवर आलेल्या रवींद्र गोंधे याने असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला माझ्यासोबत घारगावला चल, तुला शाळेत सोडतो. असे सांगून आपल्या मोटरसायकलवर बसवून घारगावच्या दिशेने नेले. मात्र शाळेकडे न नेता गोंधे तिला घारगावच्या दिशेने नेत असल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने आरडाओरडा केला. मात्र आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत गप्प बसण्यास सांगितले व मोटरसायकल वरून तिला चाकणजवळ असलेल्या वासुली या गावी त्याने अगोदरच भाड्याने घेतलेल्या खोलीवर नेले. तेथे व अन्य वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीने तिला घेत 12 डिसेंबर 2018 ते 1 जून 2020 या कालावधीत ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिला लग्नाचे खोटे अमित दाखवून, कोणाला काही सांगितलं तर जिवे मारण्याची धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर 1 जून 2020 रोजी तुला घारगावच्या ब्रिज जवळ आणून सोडले. तेथून घरी आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने झालेल्या प्रकाराचे माहिती दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 376(2)(आय), 363, 366, 324, 506, बाल लैंगिक अत्याचार आदी कलमा अंतर्गत रवींद्र गोंधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी याप्रकरणी तपास करत आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या काढल्याचे सुनावणी सुरू होती. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयंत दिवटे यांनी पीडित मुलीच्या वतीने न्यायालयासमोर बाजू मांडत या खटल्यात आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून या घटनेचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीचे वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयंत दिवटे यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. आरोपी रवींद्र गोंधे याला दोषी ठरविल्यानंतर अल्पवयीन मुलीस फुस लावून पळून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायाधीश मनाठकर यांनी या खटल्याचा गुरुवारी निकाल दिला. गोंधे याला भारतीय दंड विधान कलम 376(3) अन्वये 20 वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत पाच वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने सक्तमजुरी, भारतीय दंड विधान कलम 336 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी, भारतीय दंड विधान कलम 366 अन्वये दोन वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात भैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, दिपाली दवंगे व प्रतिभा थोरात यांनी सहाय्य केले.
COMMENTS