Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील अंगणवाडीत 20 निरागस लहानग्यांना कोंडले

पुणे : पुण्याची ओळख ही शिक्षणाचे माहेरघर म्हणून होते. मात्र याच शहरात वाढती गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होत असतांनाच दुसरीक

पशुधन विकास अधिकाऱ्यांची २ हजार ७९५ पदे भरणार – मंत्री पंकजा मुंडे
देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन – केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया
शालेय जीवनातील स्पर्धा ही राज्यसेवा व लोकसेवा स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी :- अभय आव्हाड
दाराला कुलूप, अंगणवाडीत मुलांंना कोंडले अन् सेविका सरपंचांसोबत... पुण्यातील  धक्कादायक प्रकार, CCTV समोर - Marathi News | Pune Child Safety Crisis  Hinjawadi Anganwadi 20 ...

पुणे : पुण्याची ओळख ही शिक्षणाचे माहेरघर म्हणून होते. मात्र याच शहरात वाढती गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होत असतांनाच दुसरीकडे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंजवडी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये वीस निरागस लहानग्यांना आत बंद करून सेविका आणि मदतनीस अंगणवाडीत कुलूप टाकून बाहेर गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुलं आतमध्ये भयभीत होऊन रडत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालक आणि स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. या व्हिडिओमध्ये मुलांचा गोंधळ, आक्रोश आणि भीतीचा स्पष्ट आवाज ऐकू येत आहे. हा प्रकार काही क्षणासाठी नव्हे तर जवळपास एक तास घडल्याचे सांगितले जाते. शिक्षण आणि संरक्षणासाठी असलेल्या अंगणवाडीतच मुलांना धोका निर्माण झाल्याने सर्वत्र तिव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

COMMENTS