नवी दिल्ली/प्रतिनिधी : आगामी तीन वर्षाच्या काळात आकाशवाणी आणि दूरदर्शनचे आधुनिकीकरण, अद्यावतीकरण आणि विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी 2025-26 पर्
नवी दिल्ली/प्रतिनिधी : आगामी तीन वर्षाच्या काळात आकाशवाणी आणि दूरदर्शनचे आधुनिकीकरण, अद्यावतीकरण आणि विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी 2025-26 पर्यंत 5 वर्षांचा कालावधी टार्गेट ठेवण्यात आला असून याकरता 2 हजार 539.61 कोटी रुपये खर्चाच्या प्रसारण पायाभूत सुविधा नेटवर्क विकास (बीआयएनडी) योजनेला गेल्या 4 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
योजनेत एफएम रेडिओ नेटवर्क आणि मोबाईल टीव्ही उत्पादन सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण यावर लक्ष केंद्रित करून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या प्राधान्य प्रकल्पांचा समावेश आहे. 950 कोटी रुपये किमतीचे हे प्रकल्प फास्ट-ट्रॅक मोडवर पूर्ण केले जाणार आहेत. प्रसार भारतीच्या दोन स्तंभापैकी, आकाशवाणी ही आपल्या श्रोत्यांना 501 आकाशवाणी प्रसारण केंद्रांद्वारे 653 आकाशवाणी ट्रान्समीटरसह जागतिक सेवा, 43 विविध भारती वाहिन्या, 25 एफएम रेनबो वाहिन्या आणि 4 एफएम गोल्ड वाहिन्यांद्वारे सेवा देते. केबल, डीटीएच, आयपीटीव्ही न्यूज व एअर मोबाईल अॅप, विविध युट्यूब वाहिन्या आणि 190 हून अधिक देशांमध्ये विविध प्लॅटफॉर्मद्वारे जागतिक स्तरावर दिसणार्या डीडी इंडिया या आंतरराष्ट्रीय वाहिनीसह 66 दूरदर्शन केंद्रे आणि 36 डीडी वाहिन्यांद्वारे दूरदर्शन आपल्या दर्शकांना सेवा देते. या योजनेंतर्गत देशातील एफएम व्याप्ती भौगोलिक क्षेत्रानुसार 66.29 टक्के आणि लोकसंख्येनुसार 80.23 टक्क्यांपर्यंत वाढेल जम्मू आणि काश्मीर सीमेवर आकाशवाणी एफएम ची व्याप्ती 76 टक्क्यांपर्यंत वाढेल. तसेच 30 हजार चौरस किलोमीटर परिसरातल्या श्रोत्यांसाठी रामेश्वरम येथील 300 मीटर टॉवरवर 20 किलोवॅट एफएम ट्रान्समीटर बसवला जाईल. यासोबतच प्रसार भारती सुविधांमध्ये आधुनिक प्रसारण आणि स्टुडिओ उपकरणे स्थापित करून दूरदर्शन आणि आकाशवाणी वाहिन्यांचा चेहरामोहरा बदलणे.डीडीके विजयवाडा आणि लेह येथील केंद्रे अहोरात्र चालवण्यासाठी अद्ययावतीकरण करणे. प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रम आणि अतिमहत्वाच्या कार्यक्रमांच्या चित्रीकरणासाठी फ्लाय अवे युनिट्सची सुरवात28 प्रादेशिक दूरदर्शन वाहिन्या हाय-डेफिनिशन कार्यक्रम निर्मिती सक्षम केंद्रे म्हणून रूपांतरित केल्या जातील. कार्यक्षम वृत्तसंकलनासाठी संपूर्ण दूरदर्शन नेटवर्कमधील 31 प्रादेशिक वृत्त विभाग अद्ययावत आणि अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज केले जातील.
COMMENTS