Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यात 19 हजार बालके विविध आजारांनी ग्रस्त

आरोग्य तपासणीत पुढे आली माहिती

लातूर प्रतिनिधी - आरोग्य विभागाच्यावतीने शून्य ते अठरा वर्षे वयोगटांतील बालकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान राबव

तोतया एसीबीच्या टीमचा छापा; निवृत्त अधिकार्‍याच्या घरी सिनेस्टाईलने लाखो लुटले
सोलापूरात तापमाण चाळीशी पार
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

लातूर प्रतिनिधी – आरोग्य विभागाच्यावतीने शून्य ते अठरा वर्षे वयोगटांतील बालकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत 0 ते 6 वयोगटातील 1 लाख 37 हजार 900 आणि 6 ते 18 वयोगटातील 3 लाख 54 हजार 77 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 19 हजार 495 बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळले असून, यातील 71 जणांना शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आले आहे.
बालकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान जिल्ह्यात 9 फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. शाळा, अंगणवाडीमधील एकूण 5 लाख 58 हजार 182 बालकांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये रक्तक्षय, दृष्टिदोष, त्वचा, दातासंबधी आजार, जीवनसत्त्वाची कमतरता, स्वमग्नता, जन्मजात हृदयरोग, कानासंबधी आजार, दुभंगलेले ओठासह कुपोषण आदी आजारांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी सतीष हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमुळे बालकांच्या आजाराचे लवकर निदान झाले असून, व्याधीग्रस्त बालकांना उपचार घेऊन लवकर बरे होण्यास मदत होणार आहे.अहमदपूर तालुक्यात 3009, औसा 2738, चाकूर 808, देवणी 1882, जळकोट 739, लातूर 1913, निलंगा 3753, रेणापूर 996, शिरुर अनंतपाळ 848 तर उदगीर तालुक्यातील 3009 बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले आहेत. दरम्यान, यातील 71 बालकांना शस्त्रक्रियेकरिता ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर संदर्भित करण्यात आले आहे. जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानांतर्गत 5 लाख 58 हजार 182 बालकांची तपासणीचे उद्दीष्ट होते. त्यानुसार 0 ते 6 वयोगटातील 1 लाख 37 हजार 900 आणि 6 ते 18 वयोगटातील 3 लाख 54 हजार 77 लाभार्थींची तपासणी करण्यात आली आहे. 9 फेब्रुवारीपासून हे अभियान सुरू असून, 3434 अंगणवाड्या आणि 2251 शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. शाळा, अंगणवाडीमध्ये जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. अभियानांतर्गत ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज होती त्यांना संदर्भित करण्यात आले. तर इतरांवर औषधोपचार करण्यात आले. मोहीमेमुळे बालकांच्या आजाराचे निदान झाले असून, आजार लवकर बरा होण्यास मदत होणार आहे. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा डाटाबेस तयार झाला आहे.

COMMENTS