Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणंद नगरपंचायतीसाठी 19 जण रिंगणात; पाच अपक्षांची माघार

लोणंद / वार्ताहर : लोणंद नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाचजणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 4 जागासाठी

’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?
बनगरवाडीत महिलेचा बुडून मृत्यू
खडसेंना दिलासा; अटक टळली

लोणंद / वार्ताहर : लोणंद नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाचजणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 4 जागासाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहे. चारही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजपा, शिवसेना अशी चौरंगी लढत होणार आहे. तर तीन अपक्ष रिंगणात आहेत.
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग 1 मधून प्रियांका बुनगे, प्रभाग क्र. 2 मधून स्वाती शेळके, प्रभाग क्र. 11 मधून अमित भंडलकर, प्रभाग क्र. 16 मधून मेघा व्हावळ व दत्तात्रय कचरे यांनी माघार घेतली, अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप, मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली.
अर्ज माघारी घेतल्यानंतर प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीच्या वर्षा शेळके, काँग्रेसच्या प्रतिभा शेळके, भाजपच्या दीपाली शेळके, शिवसेनेच्या अनिता माचवे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादीच्या निर्मला शेळके, अपक्ष मनीषा शेळके, काँग्रेसच्या आसिया बागवान, भाजपच्या संगीता बुटीयानी, प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादीचे भरत बोडरे, काँग्रेसचे उत्तम कुचेकर, भाजपचे श्रीकुमार जावळे, शिवसेनेचे विश्‍वास शिरतोडे, अपक्ष शरद भंडलकर यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादीच्या विनया कचरे, काँग्रेसचे प्रवीण व्हावळ, भाजपचे प्रदीप क्षीरसागर, शिवसेनेचे गणेश पवार व अपक्ष जावीद पटेल यांच्यात लढत होणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी आहे मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मेळ घालण्यास पक्षांचे पदाधिकारी कमी पडले असल्याचे यामधून दिसून येत आहे. पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बारकाईने लक्ष दिले असते तर निवडणूकीत रंगत आली असती. प्रभाग 1 मधील परिस्थिती पाहता काही ठराविक समाजातील लोकच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नावर तसा सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय झाला नसल्याने काही समाजातीलच लोक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

COMMENTS