Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तळेगाव मळे ग्रामस्थांची 178 व्या सप्ताहाची मागणी

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामस्थांनी 178 वा सप्ताह आमच्या गावात होण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत तळेगाव मळे ये

*लसीकरणामुळं देशात पहिला मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*————-
पुस्तकरुपी असलेले ज्ञान समाजाला दिशा देतात -आ. संग्राम जगताप
आसिया शेख हिची पोलिस दलात निवड

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामस्थांनी 178 वा सप्ताह आमच्या गावात होण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत तळेगाव मळे येथील ग्रामस्थांनी नाशिक येथे होत असलेली शहा पंचाळे येथे होत असलेल्या 177  व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळेस मागणीचे पत्र देऊन विनंती केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे सप्ताह व्हावा म्हणून सर्व ग्रामस्थाची इच्छा आहे. तळेगाव मळे येथे मागील वर्षी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला होता त्यावेळेस महंत रामगिरीजी महाराज यांच्या पवित्र वाणीतून तळेगाव मळे व आजूबाजूचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना ऐकण्याची संधी मिळाली होती त्यावेळेस पण जास्तीत जास्त लोकांनी भाविकांनी श्रीमद् भागवत कथा सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तन-मन धनाने मदत केली होती.पुढील वर्षी होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताह तळेगाव मळे येथे मिळाल्यास आम्ही कशाचे कमतरता न पडता एकदम व्यवस्थित पार पाडू अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे यावेळी तळेगाव मळे येथील युवा तरूण व ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

COMMENTS