Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरात 172 दहशतवाद्यांचा खात्मा

विविध हल्ल्यात 29 नागरिकांना गमवावा लागला जीव

श्रीनगर : दहशतवाद्यांच्या विरोधात राबवण्यात येणार्‍या मोहिमेत गेल्या वर्षभरात जम्मू-काश्मिरात 172 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे

जेवणासाठी मासे वाढले नाही म्हणून जमिनीवर आपटून खून!
अमोल मिटकरी हे लोकांना भुलवून आपल्या सत्तेची पोळी शेकवतात
विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत जाताना भाविकांच्या गाडीला भीषण अपघात

श्रीनगर : दहशतवाद्यांच्या विरोधात राबवण्यात येणार्‍या मोहिमेत गेल्या वर्षभरात जम्मू-काश्मिरात 172 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये 42 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरच्या डीजीपींनी ट्वीट करत ही माहिती दिली.

यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजे 108 दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ या संघटनांचे आहेत. त्यानंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 35, एसएम 22, अल- बद्रचे 4 आणि एडीयूएच या संघटनेच्या 3 दहशतवाद्यांचा समावेश आहे. या वर्षी दहशवादी संघटनांमध्ये नव्याने भरती होणार्‍यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी घटली आहे. या वर्षी 74 जण दहशवादी संघटनेते भरती झाले होते. त्यातील 65 जणांचा भारतीय लष्कराने खात्मा केलाय. यातील 17 दहशतवाद्यांना अटक केली आहे. 18 दहशतवादी अद्याप सक्रिय आहेत. डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यात 29 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील 21 काश्मीरचे स्थानिक नागरिक आणि 8 जण इतर राज्यातील होते. स्थानिक 29 नागरिकांपैकी तीन काश्मिरी पंडीत, 15 मुस्लिम नागरिक आणि 6 हिंदू नागरिकांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोर्‍यात दहशत पसरवण्यासह नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या या मनसुब्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सुरक्षा दलांनी खात्मा केलेल्या 65 दहशतवाद्यांपैकी 58 दहशवादी हे नव्याने भरती झाले होते. त्यांना भरती झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात यमसदनी धाडणयात आले, अशी माहिती डीजीपींनी दिली. सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांच्या कात्म्यासह शस्त्रसाठा देखील मोठ्या प्रमाणत जप्त करण्यात आला आहे. दहशवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान तब्बल 360 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी 121 एके सीरीज रायफल, 8 एम4 कार्बाइन आणि 231 पिस्तुलांचा समावेश आहे. याशिवाय दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात आयईडी, चिकट बॉम्ब आणि ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.

COMMENTS