Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरात 17 किलो सोने व 55 किलो चांदी किलो जप्त

नागपूर : राज्यात प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतांना, निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी तपास पथकांनी

अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाई रकमेत दुपटीने वाढ
डॉ. बापये हॉस्पीटलचा चाळीसावा वर्धापन दिन साजरा
तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन मध्ये ’डाईंग व प्रिंटींग’ पाच दिवसीय कार्यशाळेची सांगता

नागपूर : राज्यात प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतांना, निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी तपास पथकांनी कारवाई वेगवान केली आहे. नागपूर आणि पुण्यात केलेल्या कारवाईत पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. नागपूरमध्ये तब्बल 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी जप्त करण्यात आली असून तब्बल 14 कोटी रुपयांचा हा मुद्देमाल आहे. तर पुण्यातील राजीव गांधी पुलावर केलेल्या कारवाईत देखील तब्बल 1 कोटी 62 लाख रुपयांचे सोने व चांदी जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या पूर्वी पुण्यात 132 कोटींचे सोने आणि चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते.

COMMENTS