Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंतलगिरीचा पेढा खाल्ल्याने आहेर वडगाव येथील 15 जणांना विषबाधा

जिल्हा रुग्णालयात उपचारअर्थ दाखल;सर्वांची प्रकृती स्थिर

बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथील भाविक भक्त तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला गेले होते येतांनी पिण्यासाठी प्रसिद्ध असणारे कुंतलगिर

तलवाड्यात क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपने राज्यात भूकंप; आत्महत्या इशार्‍याने खळबळ, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
पेट्रोलपंपावर दगडफेक करून 115 लिटर डिझेलची चोरी

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथील भाविक भक्त तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला गेले होते येतांनी पिण्यासाठी प्रसिद्ध असणारे कुंतलगिरी येथे भाविकांनी गावाकडे घेऊन जाण्यासाठी पेढे घेतले मात्र हे पेढे खाल्ल्यानंतर दर्शनासाठी गेलेल्या अनेकांना मळमळ ,उलटी होणे, चक्कर येणे  असा त्रास सुरू झाल्याने एकूण 15 लोकांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार अर्थ दाखल केले असता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले कुंतलगिरी हे पेढ्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे येथील खवा देशभरात वितरित होतो मात्र अलीकडच्या काळात भेसळयुक्त पेढ्याचे व खव्याचे प्रमाण वाढले असून कुंतलगिरी सारख्या प्रसिद्ध ठिकाण वरूनही भेटली चे प्रकार वाढले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत असून या बाबीकडे अन्न व औषध विभागाने गंभीरतेने पाहावे लागेल.
तुळजापुरहून येताना कुंथलगिरी येथून पेढा आणला. तोच खाल्ल्याने लहान मुलांसह मोठ्या 15 माणसांना उलटी, मळमळचा त्रास सुरू झाला. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व रुग्ण बीड तालुक्यातील आहेर वडगावचे आहेत. तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आहेर वडगाव येथील भाविक गेले होते. परत येताना या भाविकांनी धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी येथून पेढा आणला. हाच पेढा गावात आल्यावर प्रसाद म्हणून सर्वांना दिला. लहान मुलांसह मोठ्या व्यतींनीही तो चवीने खाल्ला. पण शनिवारी दुपारनंतर या सर्वांना उलटी, मळमळ, जुलाबासारखा त्रास सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजता दोन मुलांना दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत 15 जण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. या सर्वांवर डॉ. रविकांत चौधरी, डॉ. राजश्री शिंदे, डॉ. शंकर काशीद, डॉ. अनंत मुळे यांच्यासह परिचारिका, ब्रदर, कक्षसेवकांनी उपचार केले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना वॉर्डमध्ये पाठविल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

COMMENTS