Homeताज्या बातम्यादेश

ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील अलकनंदा नदीजवळ स्फोट

चामोली/वृत्तसंस्था ः उत्तराखंड राज्यातील अलकनंदा नदीच्या तीरावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला असून, या दुर्घटनेत पोलिस अधिकार्‍यासह 15 जणांचा मृत्यू

माजलगाव ते तेलगाव रस्ता ऊखळुन टाकून नविन रस्त्या ला सुरूवात
व्हिजेएनटी मधील भामटा शब्द कायम ठेवा ; बंजारा समाजाच्या आमदारांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
झारखंडमध्ये पाच माओवाद्यांचा खात्मा

चामोली/वृत्तसंस्था ः उत्तराखंड राज्यातील अलकनंदा नदीच्या तीरावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला असून, या दुर्घटनेत पोलिस अधिकार्‍यासह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मदतकार्य सुरु झाले आहे.
नमामी गंगा प्रोजेक्टशी संबंधित सीवर ट्रीटमेंट प्लांटचा ट्रान्सफार्मर फाटला. त्यामुळे करंट सर्वत्र पसरुन अनेक लोक होरपळले. ट्रान्सफॉर्मर फाटल्यामुळे साइटवर करंट पसरला. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेच्यावेळी 24 लोक उपस्थित होते. जखमींना डेहराडून येथे शिफ्ट करण्यात आले. या घटनेत 1 पोलिस कर्मचारी व 2 होमगार्डही या घटनेत जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी ट्विट करुन दु:ख व्यक्त केलेे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या दुर्घटनेची न्याय दंडाधिकार्‍यामार्फत चौकशी होईल. चामोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, अलकनंदा नदीच्या जवळील ट्रान्सफॉर्मर फाटला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मागच्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सातत्याने पाऊस कोसळतोय. गंगेसह अनेक नद्यांना पूर आला आहे. या दरम्यान ही दुर्घटना घडली. डोंगराळ भागात मुसळधार वृष्टी सुरु आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागात हजारो पर्यटक खराब हवामान आणि लँडस्लाइडमुळे अडकले आहेत. उत्तराखंडच्या काही भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. भूस्खलनामुळे रस्ते बंद होते. रूद्रप्रयाग येथे पुराच्या पाण्यात एक हॉटेल वाहून गेले. यात काही जण जखमी झाले आहेत. उत्तरकाशी येथे डोंगरावरुन कोसळलेला ढिगारा थेट टेम्पोवर येऊन पडला.

COMMENTS