पुरी ः ओडिशातील पुरी येथे बुधवारी रात्री भगवान जगन्नाथाच्या चंदन यात्रा उत्सवादरम्यान फटाक्यांचा स्फोट होऊन 15 जण भाजले. अपघाताच्या वेळी विधी पाह

पुरी ः ओडिशातील पुरी येथे बुधवारी रात्री भगवान जगन्नाथाच्या चंदन यात्रा उत्सवादरम्यान फटाक्यांचा स्फोट होऊन 15 जण भाजले. अपघाताच्या वेळी विधी पाहण्यासाठी नरेंद्र पुष्करिणी सरोवराच्या काठावर शेकडो लोक जमले होते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, काही भाविक फटाके फोडत असताना फटाक्यांच्या ढिगावर ठिणगी पडून स्फोट झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS