Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये 15 कोटींची वाढ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्याला यश

फलटण / प्रतिनिधी : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केलेल्या सन

परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्याच्या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्वातंत्र्य वीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर
तहसिलदार सतिश कदम यांनी अर्थशास्त्रात पीएच. डी.

फलटण / प्रतिनिधी : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केलेल्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात शासनाच्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये 15 कोटी रुपयांची भरघोस वाढ केल्याबद्दल संस्थेच्यावतीने अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद दिले आहेत.
याबाबत रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, शासनाच्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमार्फत पत्रकारांना निवृत्ती वेतन, वैद्यकीय उपचारांसाठी मदत आदी आर्थिक सहाय्य केले जाते. मात्र, अपुर्‍या निधी अभावी ही मदत देण्यावर बंधने येत आहेत. या अनुषंगाने या कल्याण निधीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी रु. 10 कोटीच्या कायम निधीची तरतूद यावर्षापासून करावी, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. संस्थेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ना. पवार यांनी राज्य अर्थसंकल्प मांडताना, आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या व्याजातून ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा निवृत्तीवेतन देण्यात येते. हा कल्याण निधी सध्या 35 कोटी रुपयांचा असून त्यात वाढ करुन तो 50 कोटी करण्यात येत आहे, अशी घोषणा केली. याबद्दल संस्था राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देत आहे. पत्रकार सन्मान योजनेच्या पात्रतेच्या क्लिष्ट अटी शिथील कराव्यात, पत्रकारांना आरोग्य विषयक अडचणीत योग्य व तातडीची मदत व्हावी, पत्रकारांसंबंधीच्या शासकीय समित्यांचे पुर्नगठण करावे, आदी मागण्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे संस्थेचा पाठपुरावा सुरु आहे, असेही बेडकिहाळ यांनी नमूद केले.

COMMENTS