Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात 15 भरारी पथके

फसवणूक झाल्यास तक्रारी करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

अहमदनगर ः खरीप हंगाम 2024 साठी यंदा शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोज

हातचलाखीने बदलले कार्ड, खात्यातून काढले 43 हजार
रोहमारे महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड
वांबोरीतील जनता दरबारात दिव्यांग महिलेला ना.तनपुरे यांनी दिले स्वतः रेशनकार्ड

अहमदनगर ः खरीप हंगाम 2024 साठी यंदा शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. 15 भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतक-यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उभ्द्वल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा, अडचणी आल्यास संपर्क साधा.
निविष्ठा उपलब्धतेत अडचणी उदभवल्यास शेतक-यांनी तक्रारीचे निराकर्ण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष किंवा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील (0241) 2353693 किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील (0241) 2430792 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. नगर जिल्ह्यात कृषि निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. या कक्षांची जबाबदारी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक राहुल ढगे (मो.नं.7588556279), मोहिम अधिकारी अमृत गांगडे (मो.नं.7588178842) यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व समिती स्थापना करण्यात आलेली आहे. तालुका कृषि अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. शेतक-यांना गुणवत्तापूर्वक निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणुक होऊ नये. यासाठी जिल्हा स्तरावर 1 च प्रत्येक तालुका स्तरावर 1 अशी 15 भरारीपधके नियुक्ती केली आहेत. शेतक-यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणा-या अधिकृत विक्रेत्यांकडुनच बियाणे खरेदी करावेत. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेण्यात यावी. खरेदी पावतीवरील लॉट नंबर व बियाण्याच्या बंगवरील टॅग व लॉट नंबर पडताळून पहावे. बियाणे बंग फ़ोडताना वरील बाजुचा टॅग बैगेला तसाच राहावा यासाठी खालच्या बाजुने फोडावी बियाणे उगवणी संदर्भात काही तक्रार उदभवल्यास तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करणे सोईचे होण्यासाठी बियाण्याची फ़ोडलेली पिशवी टॅगसहीत पिकाची काढणी होईपर्यंत जपुन ठेवावी किटकनाशके किंआ तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासुन घावी. अधिकृत विक्री केंद्रामधुनच खते खरेदी करावीत. फिरत्या वाहनामधुन खतांची विक्री होत असल्यास तक्रार करावी. खतांचा ई-पॉस साठा, प्रत्यकक्षातील साठा तपासला जाईल. तरी निविष्ठा विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या बोगस निविष्ठांची विक्री करु नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

COMMENTS