Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवशाही बसच्या अपघातात 14 प्रवाशी जखमी

पुणे ः समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताची मालिका सुरू असतांना, शुक्रवारी पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला झालेल्या अपघातात 14 प्रवाशी जखमी

रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाची समता पतसंस्थेला भेट
महायुतीमध्ये भोसरी-चिंचवड मतदारसंघावरून रस्सीखेच
तो मृत्यु उष्माघातानेच झाला

पुणे ः समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताची मालिका सुरू असतांना, शुक्रवारी पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला झालेल्या अपघातात 14 प्रवाशी जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासला शिवशाही बसला अपघात झाला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने शिवशाही बस जात असताना नारायणगाव बायपास येथे समोरून एक दुचकी वेगात आली. समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना मागून एक कंटेनर समोर आला. यामध्ये शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघात 14 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. 

COMMENTS