वायनाड ः केरळमधील वायनाडमध्ये 29 जुलै रोजी रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनात 138 लोक अद्याप बेपत्ता आहेत. गुरुवारी सलग दहाव्या दिवशी बचावकार्य सुरू

वायनाड ः केरळमधील वायनाडमध्ये 29 जुलै रोजी रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनात 138 लोक अद्याप बेपत्ता आहेत. गुरुवारी सलग दहाव्या दिवशी बचावकार्य सुरूच आहे. या अपघातात आतापर्यंत 413 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (10 ऑगस्ट) पीडितांची भेट घेण्यासाठी वायनाडला जाणार आहेत. पंतप्रधानांचे विशेष विमान कन्नूर येथे उतरणार आहे. कन्नूर येथून पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरद्वारे भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करतील. यानंतर ते मदत छावण्यांमध्ये पीडितांना भेटतील, जिथे 10 हजारांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे.
COMMENTS