बुलडाणा/अमरावती ः विदर्भामध्ये सोमवारी दोन वेगवेगळ्या अपघातात तब्बल 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झालेल्या
बुलडाणा/अमरावती ः विदर्भामध्ये सोमवारी दोन वेगवेगळ्या अपघातात तब्बल 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झालेल्या अपघातात 8 तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावर झालेल्या अपघातात 5 अशा एकूण 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
सिंदखेडराजाजवळ एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. परंतु पोलिसांनी बचाव कार्य करत सोबतच कालांतराने वाहतूक सुरळीत केली.सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावानजीक भरधाव ट्रकने समोरून येणार्या एसटीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या भीषण अपघातात एकूण मृतकांची संख्या 8 असून 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती.
दरम्यान दुसरा अपघात अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावरील इटकी फाट्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतकांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून हे सर्वजण अमरावती येथून लग्न समारंभ आटोपून परतत होते. दरम्यान अपघातात 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर अमरावतीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.
दर्यापूर येथील एकाच कुटुंबातील 12 जण लग्न कार्यासाठी अंजनगाव सूर्जी येथे गेले होते. लग्न कार्य (वलीमा) आटोपून ते दर्यापूरकडे परत येत असताना इटकी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनालाल जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान सर्व जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे दर्यापूरवरून 9 जणांना अमरावती पाठविण्यात आले.
COMMENTS