Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशात मंदिराचे छत कोसळून 13 भाविकांचा मृत्यू

भोपाळ/वृत्तसंस्था ः मध्यप्रदेशातील इंदूरमधील बेलेश्‍वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी विहिरीचे छत कोसळून 13 भाविकांचा मृत्यू झाल्याचे स

Ahmednagar Sex Racket Exposed : हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा (Video)
नगर अर्बन बँक घोटाळा : माजी संचालक अजय अमृतलाल बोराचा अटकपूर्व जामीन फेटाळला
मुंबईच्या प्राणवायूत ठाणे, नवी मुंबईची वाटमारी

भोपाळ/वृत्तसंस्था ः मध्यप्रदेशातील इंदूरमधील बेलेश्‍वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी विहिरीचे छत कोसळून 13 भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तब्बल 40 फूट खोल विहिरीत 30 हून अधिक लोक पडले होते. विहिरीतून तब्बल 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पोलिसांनी 19 जणांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. विहिरीत चार ते पाच फूट पाणी आहे. महापालिका तीन पंपांच्या साहाय्याने पाणी काढत आहे. या विहिरीत अजूनही काही लोक बुडाल्याचा संशय आहे. सध्या बचावकार्य थांबले आहे, पाणी काढून टाकल्यानंतर बचावकार्य पुन्हा सुरू होईल.

इंदूरमधील बेलेश्‍वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी विहिरीचे छत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता. 40 फूट खोल विहिरीत 30 हून अधिक लोक पडले होते. विहिरीतून एकूण 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर पोलिसांनी 19 जणांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले, तिथे दोघांचा मृत्यू झाला. विहिरीत चार ते पाच फूट पाणी आहे. महापालिका तीन पंपांच्या साहाय्याने पाणी काढत आहे. या विहिरीत अजूनही काही लोक बुडाल्याचा संशय आहे. सध्या बचावकार्य थांबले आहे, पाणी काढून टाकल्यानंतर बचावकार्य पुन्हा सुरू होईल. इंदूरमधील या दु:खद घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी यांनी म्हटलं की, इंदूरमधील घटनेमुळे मी खूप दु:खी आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी बोलून परिस्थिती जाणून घेतली आहे. राज्य सरकारचे बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु आहे. माझ्या सहवेदना सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजाराच्या मदतीची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी रामनवमीनिमित्त मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळीही यज्ञ केला जात होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मंदिरात लोक पूजा करत होते. मंदिरात असलेल्या विहिरीवर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आले होते. पूजेच्या वेळी 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचले आणि यात 13 भाविकांचा मृत्यू झाला आहे.  

COMMENTS