Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बँकाँकहून तस्करांनी आणलेली 12 विदेशी कासवे जप्त

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4 नोव्हेंबर 2024 रोजी सीमाशुल्क अधिकार्‍यांनी बँकॉकहून आलेल्या दोन संशयित प्रवाशा

कृष्णा-कोयना नदीची पात्रे पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
अंगणवाडी सेविका, मदतनिसांना मिळणार एकरकमी लाभ
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4 नोव्हेंबर 2024 रोजी सीमाशुल्क अधिकार्‍यांनी बँकॉकहून आलेल्या दोन संशयित प्रवाशांना अडवले आणि त्यांच्या सामानात लपवलेली 12 विदेशी कासवे जप्त केली. प्रवाशांच्या ट्रॉली बॅगांमध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये प्लास्टिकच्या डब्यांत ही कासवे ठेवलेली आढळली.
वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या पश्‍चिम प्रादेशिक विभाग, नवी मुंबईतील अधिकार्‍यांनी कासवांच्या प्रजातींची ओळख पटवली आहे. आठ कासवे जपानी पाँड टर्टल (मौरेमिस जपॉनिका) प्रजातीची आहेत तर चार स्कॉर्पिअन मड टर्टल किंवा रेड चीक मड टर्टल (किनोस्टर्नऑन स्कॉर्पिऑइडेस) प्रजातीची आहेत. या दोन्ही प्रजातींचा वन्य प्राणी व वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला आळा घालण्यासाठी केलेला करार-‘सायटिस’च्या परिशिष्ट खख मध्ये तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अधिसूची खतमध्ये समाविष्ट आहेत. जप्त केलेली कासवे त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यासाठी विमानतळावरील संबंधित अधिकार्‍यांच्या ताब्यात दिली आहेत. या प्रवाशांना अटक केली असून त्यांच्यावर सीमाशुल्क कायदा 1962 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे.

COMMENTS