मध्यप्रदेशातील अपघातात 11 जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशातील अपघातात 11 जणांचा मृत्यू

बैतूल : मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यामधील झल्लार भागात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या तवेरा कारने ब

 कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात
भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू
कोंढवा परिसरातील अपघातात एकाचा मृत्यू

बैतूल : मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यामधील झल्लार भागात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या तवेरा कारने बसला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या भीषण अपघातात 5 पुरुष, 4 महिला आणि 2 लहान मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
यासंदर्भातील माहितीनुसार, कारमधील सर्व जण अमरावतीहून आपापल्या घरी परतत होते. कार चालकाला डुलकी लागली आणि कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार विरुद्ध दिशेने येणार्‍या बसला समोरा-समोर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच बैतूलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बैतूल परतवाडा रस्त्यावरील झल्लार गावात झालेल्या या दुर्घटनेबाबत बैतूलचे पोलीस अधीक्षक सिमाला प्रसाद यांनी सांगितलें की, झल्लार परिसरात बस क्रमांक एमपी 48 पी 0193 आणि तवेरा कार यांच्यात धडक झाली. गाडीतील सर्व लोक मजूर आहेत, हे सर्वजण महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावाकडे जात होते. महाराष्ट्रात काम करणारे हे मजूर दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त आपापल्या घरी गेले होते आणि आता सण संपवून तवेरा गाडीने परतत होते. या अपघातात प्राण गमावलेल्या मजुरांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

COMMENTS