Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात ट्रक आणि बसच्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू

राजस्थान प्रतिनिधी - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात आज सकाळी एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे ट्रकच्या धडकेने बसमध्ये प्रवास करणाऱ्या ११ जणांचा

दुचाकीस्वार गाडी घेऊन थेट खड्ड्यात.
अपघातात एकाच कुटुंबांतील 6 जणांचा मृत्यू
गुजरात मधील आणंद जिल्ह्यात भीषण अपघात

राजस्थान प्रतिनिधी – राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात आज सकाळी एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे ट्रकच्या धडकेने बसमध्ये प्रवास करणाऱ्या ११ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस गुजरातहून मथुरेच्या दिशेने जात होती. जयपूर-आग्रा महामार्गावरील नादबाई पोलीस स्टेशन हद्दीतील जयपूर आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हंतारा पुलावर बसचा ब्रेक फेल झाला. ड्रायव्हरने बस उभी करून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काही लोक जखमी झाले आहेत. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS