Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूरमध्ये 11 किलो मेफेड्रोन जप्त

मुंबई ःमुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या समन्वयाने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावातील

राज्य मंत्रिमंडळात होणार खांदेपालट ?
मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपची स्वाक्षरी मोहीम | LOKNews24
निकालानंतर 48 तासांत सरकार न बनल्यास राष्ट्रपती राजवट अटळ : संजय राऊत

मुंबई ःमुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या समन्वयाने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या एका छुप्या मेफेड्रोन उत्पादन कारखान्यावर छापा टाकला. 1985 च्या अमली पदार्थ आणि मनस्थितीवर परिणाम करणारे घटक (एनडीपीएस) कायदा अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या मेफेड्रोन या सायकोट्रॉपिक पदार्थाच्या बेकायदेशीर उत्पादनात सहभागी असलेल्या एका सिंडिकेटबद्दलच्या विशिष्ट गुप्त माहितीवरून कारवाई करताना, डीआरआय अधिकार्‍यांनी परिसरात सतत देखरेख ठेवली. 8 एप्रिल 2025 च्या पहाटे, संशयित ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली.
या शोध मोहिमेत 11.36 किलो मेफेड्रोन (8.44 किलो कोरड्या स्वरूपात आणि 2.92 किलो द्रव स्वरूपात), तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि या पदार्थाच्या निर्मितीत वापरली जाणारी मोठ्या-प्रमाणात प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त करण्यात आली. छुप्या पद्धतीने मेफेड्रोनच्या उत्पादनात थेट सहभागी असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलसह पाच जणांना अटक करण्यात आली. जलद आणि समन्वित पाठपुरावा करताना, वित्तपुरवठादार आणि वितरक म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणखी दोघांना मुंबईत अटक करण्यात आली. या सातही जणांनी मेफेड्रोनच्या वित्तपुरवठा, उत्पादन आणि तस्करीमध्ये आपली भूमिका कबूल केली आहे. अवैध बाजारात सुमारे 17 कोटी रुपये किंमत असलेले 11.36 किलो मेफेड्रोन, कच्चा माल आणि उपकरणे यांचा समावेश असलेली एकूण जप्ती एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार करण्यात आली.

COMMENTS