Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बुलढाणा जिल्ह्यात नाफेड कडून 11 हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता

बुलढाणा प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड तर्फे हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे, यासाठी जिल्ह्यात 11 केंद

टायर फुटल्याने कराड शहरात ऊसाचा ट्रक पलटी
वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान
कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे : कृषीमंत्री दादाजी भुसे

बुलढाणा प्रतिनिधी – केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड तर्फे हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे, यासाठी जिल्ह्यात 11 केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, 14 मार्च ते 11 जून पर्यंत हरभरा खरेदी सुरु राहणार आहे, मान्यता देण्यात आलेल्या 11 खरेदी केंद्रामध्ये, तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर केंद्र – वरवंड बकाल, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खुर्द केंद्र- साखरखेर्डा, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली, बिबी फार्मर प्रोड्युसर कंपनी, किनगाव जट्टू, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, सिंदखेडराजा या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हा पणन अधिकारी यांनी हरभरा नोंदणी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत, नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी एसएमएस प्राप्त होताच आपला हरभरा खरेदी केंद्रावर घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी मारोती काकडे यांनी केले आहे

COMMENTS