Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 छावा क्रांतिवीर सेनेचा १० वा वर्धापन १ जानेवारीला  

नाशिक प्रतिनिधी -  आज छावा क्रांतिवीर सेनेच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक सौभाग्य लॉन्स पपया नर्सरी या ठिकाणी संपन्न झाल

सुनीता इंगळे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
शिर्डीत साई परिक्रमा भक्तिमय वातावरणात उत्साहात
म्हैसाळ आत्महत्या प्रकरणी आणखी तिघांना अटक; अटक आरोपींची संख्या पोहचली 18 वर; आणखी सात जण पोलिसांच्या रडारवर

नाशिक प्रतिनिधी –  आज छावा क्रांतिवीर सेनेच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक सौभाग्य लॉन्स पपया नर्सरी या ठिकाणी संपन्न झाली.या बैठकीमध्ये येत्या १ जानेवारी २०२४ रोजी संघटनेचा १० वा वर्धापन दिन तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा याबाबत नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये सदर कार्यक्रमा संदर्भात विविध समिती गठीत करत प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली.

संघटनेच्या १० व्या वर्धापन दिनी विशेष निमंत्रित पाहुण्यां पासून ते संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,हितचिंतक,मित्र परिवार यांच्या सर्व सोयी सुविधा याबाबत नियोजन करण्या बाबत विचार विनिमय करण्यात आले.

सदर कार्यक्रम १ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता सौभाग्य लॉन्स,पपया नर्सरी,सातपूर,नाशिक येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे त्यामध्ये उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या धर्मपत्नी आयुषी ताई देशमुख कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्रीमंत छत्रपती मधोजीराजे भोसले छत्रपतींचे वंशज नागपूर संस्थान हे असणार असून कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती नामदार बच्चू कडू कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन आजच्या या बैठकीत करण्यात आले. या वर्धापन दिनामध्ये शेतकरी कामगार सहकार शिक्षण आरोग्य महिला या क्षेत्रामधील प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी ज्या कमिट्या स्थापन करायचे आहे ते सर्व अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे येत्या दोन दिवसात सर्व नियोजन कमिट्यांची निवड व  नियोजन कमिटीच्या मार्गदर्शनात करण्यात येईल अशी माहिती जिल्हाप्रमुख आशिष हिरे यांनी दिली.या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS