‘संबोधी’च्या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात 105 जोडपी विवाहबद्ध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘संबोधी’च्या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात 105 जोडपी विवाहबद्ध

ऐतिहासिक, नेत्रदिपक, मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न

परभणी/प्रतिनिधी : संबोधी अकादमी,महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, 21 व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह स

माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन
कुणबी दाखल्यासाठी मागासवर्गीय आयोगाचा दौरा
आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये पोलिसांकडून हलगर्जीपणा

परभणी/प्रतिनिधी : संबोधी अकादमी,महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, 21 व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 105 जोडपी विवाहबद्ध झाली असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नेत्रदिपक, मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. *या विवाह सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा संदेश माजी आ. विजयराव गव्हाणे यांनी वाचून दाखवला . तो संदेश असा की,”सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा उपक्रम घेत असल्याबद्दल भीमराव हत्तीअंबीरे आपले विशेष कौतुक, आपण फुले -शाहू -आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहात. सामूहिक विवाह सोहळ्यासारख्या उपक्रमाची गरज आहे, आणि आपण ती पूर्ण करत आहात..

आपल्या उपक्रमास शुभेच्छा “.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मा.खा. फौजिया खान म्हणाल्या की, शिक्षण पूर्ण करून नंतर विवाह बंधन स्वीकारावे तसेच त्यांनी या उपक्रमाबद्धल संबोधी अकादमीचे कौतुक केले. प्रमुख अतिथी म्हणून मा.शिवानंद टाकसाळे, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. परभणी, मा.देविदास पवार, प्रशासक तथा आयुक्त महानगरपालिका, परभणी, माजी खा. सुरेश जाधव,माजी आ.विजयराव गव्हाणे, माजी आ. मधुसूदन केंद्रे, प्रताप भैया देशमुख, सिद्धार्थ हत्तींअंबीरे, विजयराव वाकोडे, बी. एच.सहजराव,सुभाष जावळे, लिंबाजीराव भोसले,हेमाताई हत्तीअंबीरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक करतांना समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे म्हणाले की, श्वासात श्वास असेपर्यंत अखंडपने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार आहे. मंगल परिणय विधी पूज्य भंतेजी एस. संघमित्र,पूज्य भंतेजी आनंद, पूज्य भंतेजी भिकूनी बुद्धसेविका यांच्या हस्ते संपन्न झाला. हिंदू पद्धतीने विवाह विधी गुरु करडभाजने यांनी संपन्न केला.सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभार भगवान जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जगताप,भीमराव पतंगे,शेषराव जल्हारे,सिद्धार्थ भराडे, बी. आर. आव्हाड, दि. फ. लोंढे,डी. आर. तुपसुंदर,श्रीरंग हत्तीअंबीरे,सचिनराजे हत्तीअंबीरे, दिलीप हत्तीअंबीरे,साईनाथ बोराळकर, डॉ. कैलास फूलउंबकर, नवनाथ पैठणे, माधव मोते, भीमराव धबाले, गंगाधर परसोडे, बाळू कीर्तने,अविनाश मालसंमीदर, नवनाथ जाधव, विजय सुतारे, धनंजय रणवीर,भगवान मानकर,दिलीप पाटील, शशिकांत हत्तीअंबीरे ज्ञानेश्वर हरकळ,विश्वनाथ डबडे,अक्षय जगताप,एकनाथ खंदारे, मुरलीधर ढेंबरे,एल. आर. कांबळे, गोतम साळवे,भगवान मानकर,रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, पंकज नरवाडे, अनिरुद्ध धरपडे, राजेश चांदणे, बाबासाहेब भराडे,गोमाजी श्रावणे, संतोष भराडे, संतोष वाघ,सुनिल बोरुंडे आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS